Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या मोठी बातमी! ३७८ दिवसांपासून सुरू असलेलं शेतकरी आंदोलन अखेर संपलं; तंबू हटवण्यास...

मोठी बातमी! ३७८ दिवसांपासून सुरू असलेलं शेतकरी आंदोलन अखेर संपलं; तंबू हटवण्यास सुरुवात

0
239
जामखेड न्युज – – – – 
गेल्या वर्षभराहून अधिक काळ केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करत दिल्लीत शेतकरी आंदोलन करत होते. या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ११ डिसेंबर रोजी आंदोलन संपवून आपल्या घरी परतणार असल्याची घोषणा केली आहे.
केंद्र सरकारने पाठवलेला प्रस्ताव शेतकरी संघटनांनी मान्य केला आहे. सरकारकडून आलेल्या प्रस्तावाबाबत आम्हा सर्वांमध्ये एकमत झाल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. आम्ही मोठ्या विजयासह घरी परत जात असल्याचे किसान मोर्चाने सांगितले. ११ डिसेंबरपासून शेतकरी आपापल्या राज्यात घरी परतणार आहेत. सिंघू आणि टिकरी सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी ११ डिसेंबरला पंजाबला रवाना होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!