जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज
तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सावरगाव एका जागेसाठी एक अर्ज व आघी एका जागेसाठी एकच अर्ज आल्याने दोन्ही जागा बिनविरोध झाल्या आहेत तर जवळा येथे एका जागेसाठी तीन अर्ज तर नायगाव येथे एका जागेसाठी सहा अर्ज दाखल झाले आहेत अर्ज माघार घेण्याची तारीख ९ डिसेंबर असल्याने याच दिवशी चित्र स्पष्ट होईल अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी जामखेड न्युजशी बोलताना दिली.
सावरगाव येथे अनुसूचित जाती साठी एक जागा होती आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकच अर्ज आल्याने गणेश दत्तात्रय वाघमारे हे बिनविरोध झाले आहेत.
आघी येथे अनुसूचित जाती स्त्री एका जागेसाठी एकच अर्ज आल्याने साधना कल्याण शिंदे या बिनविरोध सदस्य झाल्या आहेत.
तर जवळा येथे एका सर्वसाधारण जागेसाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत तर नायगाव येथे एका सर्वसाधारण जागेसाठी सहा अर्ज दाखल झाले आहेत
अर्ज माघार घेण्यास नऊ डिसेंबर तारीख आहे तेव्हा त्याच दिवशी चित्र स्पष्ट होईल अन्यथा २१ डिसेंबर रोजी मतदान होईल.









