Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या मंत्र्यांच्या एकुलत्या एक मुलीचा रजिस्टर विवाहसोहळा संपन्न सर्वांसमोर ठेवला आदर्श

मंत्र्यांच्या एकुलत्या एक मुलीचा रजिस्टर विवाहसोहळा संपन्न सर्वांसमोर ठेवला आदर्श

0
375
जामखेड न्युज – – – 
 जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचं लग्न, नताशा आव्हाड
बँडबाजा, वरात असा कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्दतीने पार पडलेल्या या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा विवाहसोहळा पार पडला आहे. एकीकडे अनेक नेते मोठ्या थाटामाटात आपल्या मुलांची लग्नं लावत असताना जितेंद्र आव्हाड यांनी मात्र अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. रजिस्टर पद्धतीने करण्यात आलेल्या या लग्नात काही मोजकेच पाहुणे उपस्थित होते.
जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक कन्या नताशा आव्हाडचा विवाहसोहळा रजिस्टर पद्धतीने पार पडला. बँडबाजा, वरात असा कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्दतीने पार पडलेल्या या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यानिमित्ताने इतर लोकप्रतिनिधींसमोर आदर्श ठेवला आहे.
मुलीच्या विवाहसोहळ्यानंतर बोलताना जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचं पहायला मिळालं. “२५ वर्ष आपल्या अंगा-खांद्यावर खेळलेली मुलगी आपल्या घरात नसणार ही भावना खूप वेदनादायी आहे,” असं सांगताना त्यांना अश्रू आवरत नव्हते.
एका बापाने अशावेळी काय बोलायचं? असं सांगताना ते भावूक झाल्याचं पहायला मिळालं. “कितीही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला तरी ते होत नाही, कारण घरात दिसणारी, बागडणारी, कधीतरी अंगावर धावून येणारी, ओरडणारी आता घरात नसणार…घरातील घरपण गेल्यासारखं असेल,” हे अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!