जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
राज्यात अग्रगण्य असणारी नागेबाबा मल्टिस्टेट को- आॅप अर्बन क्रेडिट सोसायटी जामखेड शाखेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त नागेबाबा विचारधन दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांविषयी माहिती देण्यात आली.
नागेबाबा मल्टिस्टेट संस्था ही संस्थापक अध्यक्ष कडुभाऊ काळे यांच्या संकल्पनेतून उभे राहिलेले अर्थ मंदिर आहे. आज राज्यात एक अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावलौकिक मिळविला आहे. संस्थेमार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. आज जामखेड शाखेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त विचारधन दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सावळेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख रमेश (दादा) आजबे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सावरगावचे सरपंच काकासाहेब चव्हाण, अनिल (मामा ) बाबर, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीचे प्रमुख कॅप्टन लक्ष्मण भोरे, भगवान गायकवाड, दादासाहेब ढवळे, भाऊसाहेब डोके यांच्या सह रिजनल आॅफिसर देविदास कदम, पोपट जमदाडे, प्रोग्रॅम डिपार्टमेंटच्या हेड शिल्पा बारगजे मॅडम, शाखाधिकारी वैभव तांबे, संदिप टेकाडे, वसंत चव्हाण, शुभम चव्हाण, बालाजी म्हस्के यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रस्ताविक करताना देविदास कदम यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रम व कार्याबद्दल माहिती दिली
नागेबाबा मल्टिस्टेट ही संस्था एक अर्थ मंदिर आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. तसेच विचारधनाची पुस्तके सवलतीच्या दरात प्रत्येक शाखेत मिळतात या संस्थेचे वैशिष्टे म्हणजे हि संस्था वर्षभरात ३६५ दिवस सकाळी ९ ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत नियमितपणे सुरू असते.
संस्थेच्या सामाजिक उपक्रमाबद्दल संस्थेला जाणीव हा सामाजिक कार्याबद्दल तसेच झी चोवीस तासचा उड्डाण हे पुरस्कार मिळाले आहेत.
नागेबाबा मल्टिस्टेटच्या जामखेड शाखेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त नागेबाबा विचारधन दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.