जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
नुकताच पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर ( दादा) यांचा वाढदिवस झाला त्यानिमित्ताने अनेक नेते, पदाधिकारी व अधिकारी कार्यकर्ते यांनी फोन द्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या एका सर्वसामान्य नागरिकांने हार्ट टू हार्ट हृदयस्पर्शी भेटून सोशल मिडीयावर शुभेच्छा दिल्या…!
सामान्य घरात जन्मलेला जनतेचा सेवक सभापती भगवान दादा मुरूमकर अनेकांच्या गळ्यातील ताईत बनलेला हा नेता तालुक्यात लोकनेता आहे अहोरात्र जनतेच्या सेवेत असतात अनेकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच चोवीस तास रस्त्यावर असतात. त्यांचा नुकताच काल वाढदिवस येऊन गेला त्यांना वाढदिवसाच्या महाराष्ट्रातून अनेक रथी-महारथी दिग्गज नेते मंडळींनी फोन करून शुभेच्छा दिल्या त्यामध्ये विशेष छत्रपती महाराज उदयनराजे भोसले, पंकजाताई मुंडे, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, आमदार सुरेश आण्णा धस, आमदार मोनिका राजळे, आमदार निलेश लंके, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, मराठा गौरव युवराज भाऊ काशिद, पुण्याचे महापौर नितीन आप्पा काळजे, माजी खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव खेडकर, सोमनाथ पाचरणे, अनिल लोखंडे, तसेच अनेक जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य सरपंच अशा अनेक दिग्गज मान्यवरांनी महाराष्ट्र मधून त्यांना भरघोस शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान केला.
या निमित्ताने झालेली भेट व दिलेलं प्रेमाने आलिंगन..
स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा एक लाडका कार्यकर्ता म्हणून भगवान दादांची ओळख या धकाधकीच्या व घडामोडी च्या काळामध्ये दादांचे अनेक स्वप्न राहून गेले आहेत आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना ती दादांचे सर्व स्वप्न पूर्ण होवोत.
तू चाल पुढं तुला र गड्या भीती कुणाची पर्वा कशाची
ह्याच दादा तुम्हाला शुभेच्छा शुभेच्छुक लक्ष्मण सस्ते पाटोदा..! या कार्यकर्त्याने दिलेल्या शुभेच्छा सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत.
कोरोना काळात कोणीही घराबाहेर पडत नव्हते या काळात नागरिकांना धीर व आधार देण्याचे काम डाॅ. भगवानराव मुरुमकर यांनी केले. साकत गणातील संपुर्ण नागरिकांना
तसेच तालुक्यातील संपुर्ण शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तालुक्यातील सुमारे पस्तीस हजार लोकांना अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे मोफत वाटप केले. तसेच कोरोना रूग्णांना प्रत्यक्ष हाॅस्पिटलमध्ये भेटून आधार दिला तसेच ज्या रुग्णांना बेड मिळत नव्हते त्याना बेड मिळण्यासाठी प्रयत्न केला, अनेकांना रेमडेसीवीर इंजेक्शन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले यामुळे नागरिकांना मोठा आधार मिळाला. जगण्याची नवी उमेद मिळाली असेही नागरिकांनी शुभेच्छा मनोगतात आपले मनोगत व्यक्त केले.