जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
गेल्या वीस वर्षांपासून राजकारण कमी व समाजकारण जास्त करणारे “हॅलो म्हटले की आलो” म्हणून प्रसिद्ध असणारे नेहमी जनतेच्या सुख दुःखात सहभागी असणारे खर्या अर्थाने लोकनेते म्हणून ओळख निर्माण करणारे पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर मुरुमकर यांचा वाढदिवस तालुक्यातील अनेक गावात मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
डॉ. भगवानराव मुरुमकर यांना भाजपाचे खासदार महाराज छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके, भाजपाचे युवा नेते सुवेंद्र गांधी सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी फोन करून शुभेच्छा दिल्या तसेच तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व सर्व सामान्य नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा दिल्या तसेच वेगवेगळ्या ठिकाणी वाढदिवस साजरे केले.
आपल्या वाढदिवसानिमित्त साकत गणातील 56 अंपग लोकांना एस टी प्रवास व त्याच्या बरोबरील एक व्यक्तीला मोफत प्रवास करता येणार स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले. याचा फायदा दिव्यांग व्यक्ती व बरोबर एका व्यक्तीला आजीवन मिळणार आहे.
दि. १ डिसेंबर रोजी सकाळ पासूनच विविध गावांत तसेच
पंचायत समिती हाँल मध्ये पंचायत समिती कर्मचारी यांच्या तर्फे वाढदिवस साजरा करण्यात आला तालुक्यात सरपंच उपसरपंच यांनी पंचायत समिती मध्ये येऊन शुभेच्छा दिल्या
व विविध ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व शुभेच्छा दिल्या.
पंचायत समिती मध्ये सत्काराला उत्तर देताना माजी सभापती भगवान दादा म्हणाले सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू माणुन मी वीस वर्षे झाले राजकारण करत आहे राजकारण कमी व समाजकारण जास्त करतो जनतेने हाक दिली की मी त्याच्या मदतीला धावून जाण्याचा प्रयत्न करतो. यामुळेच आज संपुर्ण तालुका प्रेम करत आहे.





