जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ यांचे सुपुत्र पृथ्वीराजे गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साकेश्वर गोशाळेतील गोवंशाना तीन दिवस पुरेल एवढा हिरवा चारा दिला आहे. यामुळे वडिलांच्या समाजकार्याचा वसा पृथ्वीराजे यांनी पुढे चालवलेला आहे. यामुळे पृथ्वीराजे गायवळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जय गो माता आज वार शनिवार दि. २० नोव्हेंबर रोजी गोमाता व गोवंश जतन अभियानांतर्गत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड संचलीत श्री साकेश्वर गो शाळा साकत या ठिकाणी श्री निलेश भाऊ गायवळ यांचे चिरंजीव श्री पृथ्वीराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून व आपले धर्म कर्तव्य समजुन आपला हा आजचा वाढदिवस गो मातेच्या सानिध्यात साजरा केला त्या निमित्ताने येथील सर्व गो मातांना ३ दिवस पुरेल ईतका हिरवा चारा देण्यात आला.
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला |
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया ||
परमपुज्य जी वंद्य या भारताला |
नमस्कार त्या दिव्य गो देवतेल ||
वरील श्लोकाप्रमाने स्वतः च दुध, गो मुत्र, शेण, तसेच स्वतः चा गो वंश देखील या देशाच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी अर्पण करणार्या दिव्य गो माता आमचा नमस्कार. आज संपूर्ण जग हे कॅन्सर या महाभयान रोगाने ग्रासले गेले आहे दररोज लाखो निष्पाप लोक या रोगाने दगावत आहेत याचे मुख्य कारण म्हणजे च संकरीत गायींचे दुधाचे सेवन हेच आहे.
अख्या जगाला हारवायची ताकत असलेल्या या तरूण हिंदुस्थानाला आतुन पोखरण्याचे मोठे षडयंत्राचा एक भाग म्हणजे देशी गायी संपवून संकरीत गायीचे दुध आज संपुर्ण हिंदुस्थान विकले जात आहेआहे. जन्मजात बाळाला आईचे दुध मिळत नसेल तर फक्त देशी गायीचेच दुध दिले जाते व तेच पचते त्यामुळे संपूर्ण जगाच्या आईच्या जागी देशी गायीला महत्त्व आहे तसेच डास नाहीसे करण्याकरता वापरण्यास येणारे केमिकल्स युक्त आगरबत्तीने श्वसनाला त्रास होतो त्या ऐवजी जर देशी गायीच्या शेणाची गौरी चा जर धुर केला तर संपूर्ण डास नाहीसे होतात.
आजचे विज्ञान हे आपल्या शेकडो वर्षांपूर्वीच्या आपल्या सनातन धर्माच्या आधारे व उभे आहे आणि शोकांतिका ही आहे हे ही गोष्ट परकियांना समजते व आपन आजुन देखील गाफील आहोत. मानवी जातीच्या कल्याण आणि उद्धारासाठी देशी गाय व गोवंश जगणे ही काळाची गरज आहे व या शिवाय मानवी जातीचे कल्याण होणे शक्य नाही त्यामुळे आपला देश हिंदुस्थान हा बलशाली, निरोगी, व सदृढ ठेवण्यासाठी आपल्या देशी गायींचे जतन व संगोपन करणे हे कर्तव्य आहे त्यासाठी सर्वांनी आपले वाढदिवस, आई वडिलांची व महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी ला इतर अनावश्यक खर्च टाळून श्री पृथ्वीराज गायवळ याच्या प्रमाणे देशी गोवंश जतनासाठी आपले कर्तव्य समजुन मदत करावी असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान जामखेडचे पांडुराजे भोसले यांनी यावेळी केले.
यावेळी तरडगावचे ग्रामपंचायत सदस्य रेवन सांगळे, शिवाजी सांगळे, खंडागळे नाना आदी उपस्थित होते.
श्री साकेश्वर गोशाळेत सुमारे शंभर लहान मोठे गोवंश आहेत. आजीनाथ पुलवळे व त्यांचे कुटुंबीय ही गोशाळा सांभाळतात. पृथ्वीराजे गायवळ प्रमाणे इतरांनीही आपली संस्कृती टिकवण्यासाठी गोवंशाचे जतन करण्यासाठी गोशाळेला मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.




