जामखेड न्युज – – – –
विधानभवन, मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आ.नाना पटोले, शिक्षणमंत्री ना.वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत शिक्षणाच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात महत्त्वपूर्ण मिटिंग पार पडली.
ADVERTISEMENT 

यावेळी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ.डॉ सुधीर तांबे, आ.विक्रम काळे, आ.बाळाराम पाटील, आ.अभिजित वंजारी, आ.कपिल पाटील, आ.किरण सरनाईक, आ.मनीषा कायंदे, आ.संग्राम थोपटे, आ.अमित झनक, मा.प्रकाश सोनवणे, शिक्षण सचिव वंदना कृष्णा, राहुल द्विवेदी, सहसचिव ह.मु.काझी, शिक्षण संचालक पालकर साहेब तसेच शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
ADVERTISEMENT 

यावेळी प्रामुख्याने पायाभूत वाढीव पदे, त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना अनुदान देणे, संच मान्यता, 01 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या अंशतःअनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.
ADVERTISEMENT 

अपंग एकात्मिक शिक्षकांचे समायोजन करणे व आय.टी शिक्षकांना सेवेत नियमित करणे या विषयांवर चर्चा झाली.
ADVERTISEMENT

तसेच मा.शिक्षणमंत्री यांच्याकडे या सर्व विषयांची लवकरात लवकर सोडवणूक करावी अशी आग्रही मागणी यावेळी आ.डॉ.तांबे तसेच विधानपरिषदेचे सन्मा. सदस्य यांनी केली.




