Sunday, February 15, 2026
Home ताज्या बातम्या अजितदादांच्या रॅलीतील पाकिटमाऱ्यांना कर्जत पोलीसांनी पकडले

अजितदादांच्या रॅलीतील पाकिटमाऱ्यांना कर्जत पोलीसांनी पकडले

0
266
जामखेड न्युज – – – – 
         १३ नोव्हेंबरला कर्जत शहरांमध्ये बाजार तळ याठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विविध विकास कामाचे संदर्भात सभा होती. या सभेसाठी ज्ञानेश्वर प्रभाकर सायकर (राहणार सायकर वस्ती, राशीन) हे आले होते. दुपारी सायकर हे श्री संत गोदड महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मंत्रीमहोदया सोबत गेले असता गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या पाठीमागे असलेल्या अनोळखी इसमाने त्यांचे पॅंटची पाठीमागील खिशातील हात घालून पाकीट काढत असल्याचे त्यांना जाणवल्याने त्यांनी सदर अनोळखी इसमाचा हात पकडला. त्यावेळी त्या इसमाचे हातात सायकर यांना त्यांचे पाकीट दिसले त्याच वेळी सदर इसम त्यांना जोराचा धक्का देऊन हातातील पाकीट हिसकावून साथीदारांसह पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी आरडा ओरड केल्याने जवळच बंदोबस्त करता हजर असलेले पोलीस यांनी त्याचा पाठलाग करून पकडले होते.
                               ADVERTISEMENT                        
थेट उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांच्या उपस्थितीत हे धाडस करणारे आरोपी अमोल पंढरीनाथ विटेकर (वय २५ वर्षे, राहणार माऊली नगर, पेठ बीड, तालुका जिल्हा बीड) आणि नदीम अख्तर फय्याज अहमद।(वय ३० वर्ष, राहणार आजाद नगर, मालेगाव जिल्हा नाशिक) असे असून सदरचे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी विविध पोलिस स्टेशनला चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत.
                       ADVERTISEMENT 
त्याचेवर कर्जत पोलीस स्टेशनला जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर दिवशी आणखी २ लोकांचे मोबाईल चोरी गेले होते. आरोपींना न्यालायत हजर केले असता न्यालायने त्यांना ४ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. सदर आरोपी कडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे .सादर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अंधारे हे करत आहेत.
                          ADVERTISEMENT  
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव , सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने, सतीश गावित, पोलीस उप निरीक्षक अमरजित मोरे, पोलीस अंमलदार अमित बर्डे, शकील बेग, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनिल खैरे, गोवर्धन कदम स्थानिक गुन्हे शाखेचे बबन मखरे, संदीप चव्हाण यांनी केली आहे.
                          ADVERTISEMENT  
 कर्जत आगोदर जामखेड मध्येही उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व आमदार रोहित पवार याची भव्य रॅली व जाहिर सभा होती याठिकाणीही काही पाकिटमारे आलेले होते पण जामखेड पोलीसांच्या सतर्कतेमुळे सभेआगोदरच एका पाकिटमाऱ्यांला पकडले, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी चौफेर नजर ठेवल्याने कोणाचेही पाकिट किंवा मोबाईल गेल्याची तक्रार आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!