जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड तालुक्यातील कुसडगाव राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१९ कुसडगाव अहमदनगर येथे सशस्त्र पोलीस
भरती -२०१९ लेखी परिक्षा दिनांक १२/१२/२०२१ रोजी नियोजित आहे. सदर भरतीची मुख्य प्रक्रिया समादेशक,
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ०७ दौंड पाहतील मात्र सदर भरतीसाठी प्राप्त आवेदन अर्जावरून सदर भरतीची लेखी परिक्षा चार केंद्रांवर पार पाडण्याचे निश्चित केले आहे.
ADVERTISEMENT 

सदर भरतीची लेखी परिक्षा पार पाडण्याकरीता खालील प्रमाणे समादेशक यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
समादेशक केंद्र प्राधिकृत समादेशक
पुणे. समादेशक गट क्र.०७ दौंड
नागपुर समादेशक गट क्र.०४ नागपुर
औरगाबाद समादेशक गट क्र.१४ औरंगाबाद
नाशिक समादेशक गट क्र.०६ धुळे
ADVERTISEMENT 

सदर लेखी परिक्षेवर नियंत्रण, देखरेख व त्याकरीता लागणारे मनुष्यबळ व बंदोबस्त हे प्राधिकृत केलेले
समादेशक पाहतील व लेखी परिक्षा पुर्ण झाल्यावर उत्तर पत्रिका एकत्रित करुन गार्डासह रारापोबल गट क्र.७ दौंड येथे पाठविण्यात याव्यात व समादेशक रारापोबल गट क्र. ०७ दौंड यांनी सदर उत्तर पत्रिका एकत्रित स्कॅन करुन लेखी परिक्षेचा निकाल जाहिर करावा व पुढील भरती प्रक्रिया राबविण्यात यावी. पोलीस उपमहानिरीक्षक रारापोबल पुणे हे सदर भरती प्रक्रियेचे पर्यवेक्षक व निरीक्षक असतील तेसच भरती प्रक्रियेचा आढावा घेवून त्याबाबत लागणारे मार्गदर्शन करावे आणि या कार्यालयास वेळोवेळी अवगत करावे.
ADVERTISEMENT 

तालुक्यातील कुसडगाव येथे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 हे प्रशिक्षण केंद्रात अकराशेहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांची कुटुंबाची निवास व्यवस्था होणार आहे. त्यामुळे या भागातील सिक्युरिटीबरोबरच सर्वच शेती, दुध, पालेभाज्या व अन्य लहान-मोठ्या व्यवसायिकांसाठी ही चांगली संधी ठरेल. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेल. येथे सेवार्थ दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यामुळे परिसरातील शाळा- महाविद्यालयांना मोठी विद्यार्थी संख्या उपलब्ध होईल. सर्वांसाठीच हे प्रशिक्षण केंद्र पर्वणी ठरेल. वैभवात पडेल भर पडणार आहे.
ADVERTISEMENT

माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांची मंत्री आसताना पाठपुरावा करत कुसडगाव येथे राज्य राखीव पोलीस दल बल क्रमांक १९ हे आणले होते पण काही तांत्रिक कारणांमुळे ते जळगाव जिल्ह्य़ात गेले होते यासाठी परत आमदार रोहित पवार यांनी निवडून आल्यानंतर त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.अखेर त्यांच्या प्रयत्नांना फळ मिळाले. या प्रशिक्षण केंद्रांमुळे जामखेड तालुक्याच्या वैभवात मोठ्या प्रमाणावर भर पडणार आहे. जामखेडची ओळख राज्याच्या नकाशावर ठळकपणे होईल. रोहित पवार आमदार झाल्यापासून कर्जत- जामखेड हा मतदारसंघ राज्यात निरनिराळ्या कारणाने नेहमीच चर्चेत राहिला आहे.या भागातील अनेक प्रश्न प्रलंबित प्रश्न प्रलंबित योजना मार्गी लावण्यासाठी आमदार रोहित पवारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. अनेक योजनांना हिरवा कंदील मिळवला. त्यामुळे मतदारसंघाची मान निश्चितपणे उंचावणार आहे.
जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे दोन वर्षांपूर्वी,राज्य राखीव पोलीस बल गट क्र,19 पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास गृह विभागाने मंजुरी दिली होती. मात्र, हे प्रशिक्षण केंद्र जळगाव जिल्ह्यात हलवण्यात आल्याने जामखेडकरांना मिळालेली महत्वकांक्षी योजना हातातून गेली होती. मात्र, हे पोलिस प्रशिक्षण केंद्र पुन्हा कुसडगावलाच व्हावे याकरिता आमदार रोहित पवारांनी राज्याच्या मंत्रीमंडळात आपले वजन वापरले.सातत्याने सुरू होता पाठपुरावाराज्याच्या इतर भागात शिफ्ट झालेलं हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा नव्याने जामखेड तालुक्यातील कुसगाव येथे मंजूर करून घेतले. चार-पाच महिन्यापासून आमदार रोहित पवारांचा याकरिता पाठपुरावा सुरू होता. अशी माहिती त्यांनी जामखेड न्युज ऐतिहासिकशी बोलताना दिली. हे पोलीस प्रशिक्षण केंद्र याठिकाणी झाल्याने सेफ्टी आणि सिक्युरिटी चा चांगला फायदा होणार आहे. हे सेंटर नगरसाठी एकुलते एक आहे. त्यामुळे नगरला मोठी मदत होईल. सोलापूर, उस्मानाबाद, बीड या शेजारच्या जिल्ह्यांनाही या प्रशिक्षण केंद्राची मदत होणार आहे. गेली चार-पाच महिन्यांपासून प्रयत्न करुन जळगावात गेलेले राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र पुन्हा नव्याने कुसडगावला मंजूर करून घेतले. ते लवकरच मार्गी लागेल. याचा फायदा नगरसह परिसरातील चार जिल्ह्याला होणार आहे.
– रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड.