मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा दारुण पराभव, लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या वाघिनीचा दणदणीत विजय

0
245
जामखेड न्युज – – – 
 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. दादर नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांचा प्रचंड विजय झाला आहे. कलाबेन यांनी भाजपच्या उमेदवार महेश गावीत यांना तब्बल 50 हजाराच्या मताधिक्याने पछाडलं आहे.  काही दिवसांपुर्वी दादरा नगर हवेलीतील माजी खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली होती. मरिन ड्राईव्ह परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचे महाराष्ट्र विधानसभेत पडसादही उमटले होते.
                     ADVERTISEMENT  
मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते. 1989 मध्ये डेलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. ते सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते. मोहन डेलकर हे काँग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष यांच्या तिकीटावर खासदार झाले होते. मात्र 2019 मध्ये ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले होते. दरम्यान त्यांची अचानक आत्महत्या केल्यानंतर येथील लोकसभेची जागा रिक्त झाली होती. त्यानंतर तिथे पोटनिवडणुक लागल्यानंतर मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेने कलाबेन यांना तिकीट दिलं होतं. आज झालेल्या मतमोजणीत कलाबेन यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार महेश गावीत यांचा 47 हजार 447 मतांनी पराभव केला.
                 ADVERTISEMENT  
 आज सकाळी साडे आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण 22 राऊंड पार पडले. यावेळी कलाबेन यांना एकूण 1,12,741 मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार महेश गावीत यांना 63 हजार 382 मते मिळाली. दरम्यान शिवसेनेचा हा महाराष्ट्राबाहेरचा पहिलाच विजय असून या निमित्ताने शिवसेने महाराष्ट्राबाहेर विजयाचं खातं उघडलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here