जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
नगरसेवक शामीरभाई स्थानिक राजकारणात प्रवाहाविरुध्द चालले मात्र आपल्या प्रभागातील नागरिकांशी प्रामाणिक राहुन कामाचे वेगळेपण दाखवून दिले त्याच्या चालण्या बोलण्यात शिवसेना दिसत आहे. म्हणुन नगरसेवक शामीर सय्यद यांच्या पाठाशी यापुढे शिवसेना पक्ष उभा राहील असे आश्वासन दिले शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी सांगितले.
नगरसेवक शामीर सय्यद यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी आदर्श उद्यानचा लोकार्पण सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला त्यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी व जामखेड पोलिस निरिक्षक संभाजी गायकवाड, नगरसेवक अमित चिंतामणी, हर्षदभाई, शेरखान भाई, जलिल सय्यद ह्या मान्यवराच्या उपस्थिती मध्ये आदर्श लोकार्पण सोहळा पार पङला
त्यावेळी बोलताना राजेंद्र दळवी म्हणाले की, नगरसेवक शामीरभाई स्थानिक राजकारणात प्रवाहाविरुध्द चालले मात्र आपल्या प्रभागातील नागरिकांशी प्रामाणिक राहुन कामाचे वेगळेपण दाखवून दिले त्याच्या चालण्या बोलण्यात शिवसेना दिसत आहे म्हणुन नगरसेवक शामीर सय्यद यांच्या पाठाशी यापुढे शिवसेना पक्ष उभा राहील असे आश्वासन दिले
जामखेड चे पोलिस निरिक्षक संभाजी गायकवाड म्हणाले आदर्श उद्यांनामाध्यातुन भाईचारा वाढणार व माताभगिंनी मनमोकळ्या पणाने फिरता बोलता येइल लहान मुलांना खेळण्यासाठी वृद्धांना बसता येईल आपला विरंगुळा करता येईल त्यामुळे या आदर्श उद्यान वार्ड क्र सहा साठी मनजुळण्याचं व करमणुकीचं ठिकाण होईल
त्यावेळी नगरसेवक अमित चिंतामनी यांनी मनोगत व्यक्त केले शामीरभाईना शुभेच्छा दिल्या

नगरसेवक शामीरभाई सय्यद यांनी आभार मांडतांना म्हणाले मला जनतेसाठी खुप काही विकास कामे करायचे आहेत त्यामुळे आवधी कमी पडला परंतु जनतेने परत संधी दिल्यास संधीचं सोन करेण माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहीलात त्यामुळे काम करण्यास उर्जा मिळते
त्यावेळी उपस्थित भगवान कोकणे, शाकीर शेख, उबाळे सर, समिंदर सर, संदीप भोरे, बंडु आंदुरे, ढोबे सर, दहिकर साहेब, संपत चखाले, मेजर राजेंद्र काळे, सचिन शिंदे, अजहर खान, दत्तात्रय चर्हाटे, नाजीम शेख, यासीर सय्यद, सादीक शेख, हमींद तांबोळी, ईसं्माईल शेख, चँाद तांबोळी आदि नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाला महिलाची संख्या मोठ्याप्रमाणात उपस्थित होत्या त्यावेळी मुलीनी नाटकांच्या माध्यमातुन नगरसेवक शामीर सय्यद यांच्या काम करण्याची पध्दत वार्डाचा विकास यांच चित्रण दाखवले सुत्रसंचालन सरसमकर सरांनी केले तर महिलांचे व मुलांचे स्वागत शहाबाज सय्यद यांनी केले






