जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
स्वयंम शिक्षण प्रयोग जामखेड, WHH, GIZ यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड तालुक्यातील मोहा या गावात अपंग, निराधार, भूमिहीन, विधवा, अतिगरीब गरजू लोकांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. या अन्नधान्य कीट वाटपाच्या कार्यक्रमाला गावचे सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य स्वयंम शिक्षण प्रयोगचे तालुका समन्वयक नवनाथ वाघमोडे, ग्रामसेवक प्रशांत सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत होते. या संस्थेच्या पुढाकारातून तालुक्यातील प्रत्येक गावातील 17 लोकांची निवड करून त्यांना मदत केली या किटमध्ये गहू, ज्वारी, तांदूळ, डाळ, तेल, साबण व हिमालय किट असे आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते संतोष गर्जे यांनी केले व मोहा ग्रामस्थांच्या वतीने स्वयंम शिक्षण संस्थेचे नवनाथ वाघमोडे यांचा सत्कार सरपंच शिवाजी डोंगरे यांच्या हस्ते केला व संस्थेची ओळख, वाटपाचा उद्देश, या विषयी माहिती दिली.
स्वयंम शिक्षण प्रयोगचे नवनाथ वाघमोडे यांनी बोलताना सांगितले की, संस्थेच्या माध्यमातून जामखेड तालुक्यातील 50 गावात स्वयंम शिक्षण संस्था काम करत असून विशेष करून महिला व सेंद्रिय शेती या विषयावर काम करत असून महिलांनी घरच्या घरी सेंद्रिय भाजीपाला पिकऊन शेतातील खर्च कमी करण्याविषयी, सेंद्रिय खत व्यवस्थापन एकत्रित पीक पद्धत याच्या वापरातून कुपोषणाचे कशा प्रकारे निर्मुलन केले जाऊ शकते या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले व गरजुंसाठी किराणा किटचे वाटप करत असल्याचे सांगितले. तर आभार प्रदर्शन SSP लीडर दुर्गा गर्जे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी CRP मयुरी रेडे यांनी मोलाचे सहकार्य केली.






