सिद्धटेक येथे पर्यटन व आपत्तीकाळात बचावकार्यासाठी यांत्रिक पॅसेंजर बोटीचे लोकार्पण…आमदार रोहित पवार यांच्याहस्ते ३० प्रवासी क्षमतेच्या यांत्रिक बोटीचे उद्घाटन.

0
240
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
 जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धटेक येथे आमदार रोहित पवार माध्यमातून जिल्हा परिषदेच्या मार्फत पर्यटन व संकटकाळात बचावकार्यासाठी ३० प्रवासी क्षमतेच्या यांत्रिक बोटीचा लोकार्पण सोहळा गुरुवार, २८ ऑक्टोबर रोजी पार पडला. या उदघाटन सोहळ्याचा पहिला यांत्रिक बोट प्रवास हा अनोख्या पद्धतीने पार पडला निराधार आजी आजोबा, आश्रमातील अनाथ मुले आणि शेतकरी बांधव यांना घेऊन या बोटीने गणेशवाडी ते सिद्धटेक असा प्रवास करण्यात आला, या प्रसंगी उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद मोठा होता.
कर्जत-जामखेड मतदारसंघात सर्वसामान्य नागरिकांना सर्व सुविधांची पूर्तता करण्यासाठी आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतात. मतदारसंघात आपत्तीग्रस्त स्थितीमध्ये नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूने, तसेच मतदारसंघात पर्यटनासाठी येणाच्या नागरिकांच्या सुविधेसाठी आणि सुरक्षेच्या अनुषंगाने सिद्धटेक येथे संकट काळी मदतीसाठी आ. रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नांतून पर्यटन आणि बचावकार्य अशा दुहेरी कार्यासाठी ३० प्रवासी क्षमता असलेली बोट उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सिद्धटेक येथे मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना मतदारसंघातील राशीन, कर्जत, खर्डा, जामखेड, चोंढी अशा इतर पर्यटन स्थळी नागरिकांनी भेट द्यावी, या माध्यमातून येथे व्यवसाय, रोजगार संधी निर्माण व्हावी यासाठी पर्यटन विकासासाठी आमदार रोहित पवार आणि प्रशासन यांच्यामार्फत प्रयत्न केले जात आहेत.
जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या मार्फत जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजना २०२०-२१ च्या अंतर्गत मौजे सिद्धटेक ता. कर्जत, जि. अहमदनगर येथे २८ प्रवासी क्षमता असलेल्या यांत्रिक बोटीचा उद्घाटन सोहळा पार पडला. गावातील शेतकरी, मजूर, निराधार वृद्ध आजी-आजोबा, आश्रमशाळेतील अनाथ मुले यांना यांना घेऊन या बोटीतून गणेशवाडी ते सिद्धटेक असा प्रवास करून सदर यांत्रिक बोटीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, प्रांत अधिकारी अजित थोरबोले, तहसीलदार नानासाहेब आगळे, बीडीओ अमोल जाधव, ह्या यांत्रिक बोटीची  निर्मिती करणारे व्ही. डी. जामदार, तसेच नागरिक, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here