जामखेड प्रतिनिधी
जामखेड महाविद्यालय जामखेड मधील भुगोल विभागाचे प्रा. डाॅ. सुनील नरके व इंग्रजी विषयाचे प्रा. डाॅ. शत्रुघ्न कदम यांची प्राध्यापक पदी नियुक्ती विद्यापीठ व शासनाच्या निवड समितीमार्फत झाल्याबद्दल जामखेड महााविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाचा फायदा होणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निवड समितीने त्यांची निवड केली आहे त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव (बापू) देशमुख, सचिव मोरेश्वर देशमुख, उपाध्यक्ष अरुणशेठ चिंतामतणी, खजिनदार राजेशजी मोरे, सहसचिव दिलीपशेठ गुगळे, संचालक अशोकशेठ शिंगवी, सैफुल्ला
खान, सुमतीलाल कोठारी, बबनराव कुलकर्णी, रामदासजी फुटाणे, शरद काका कुलकर्णी सह महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश फलके, प्रा. मधुकर राळेभात सह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक स्टाफ व मित्रमंडळी वसंत राळेभात, तुकाराम अंदुरे, सोमनाथ तनपुरे, नितीन राळेभात, सोमनाथ पोकळे, आण्णा मांजरे यांनी अभिनंदन केले आहे.