जामखेड तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींसाठी 82.47 टक्के मतदान

0
196
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींसाठींची मतदान प्रक्रिया किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली
युवा वर्ग व वृद्धांची उत्साह दिसून आला. एकुण 82.47 % मतदान झाले आहे. उमेदवाराचे भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले असून सोमवार दि. 18 रोजी निकाल जाहीर होणार आहे.
जामखेड तालुक्यात 39 ग्रामपंचायतींसाठी 128 मतदान केंद्र आहेत एकुण मतदार 67368 आहेत यात पुरुष 36147 तर स्त्री 31221 असे मतदार आहेत यापैकी  पुरुष 29980 तर स्त्री 25647 एकुण 55557 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. एकुण 82.47 % विक्रमी मतदान झाले आहे.
  दिवसभर काही किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे सतर्क होते कोणीताही गैर प्रकार केल्यास त्याची गय केली जाणार नाही असा पुर्वीच प्रशासनाच्या वतीने इशारा देण्यात आला होता त्यामुळे किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले.
तालुक्यातील साकत येथे 90 वर्षांच्या व्यक्तींचे तीन चाकी सायकलवर येत मतदानाचा हक्क बजावला. महिला वयोवृद्ध व्यक्ती व अपंग मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला अनेक मतदार केंद्रावर गर्दी दिसत होती. तसेच सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर गर्दी होती. त्यामुळे आकडेवारी मिळण्यास उशीर झाला होता.
   तालुक्यातील खर्डा येथे 72.3 %, नान्नज 75 % साकत 82 %,  अरणगाव 79.50 %
 साकत येथे 4190 पैकी 3385 मतदानाचा हक्क बजावला. सुमारे 82 % मतदान झाले.
  तालुक्यात एकूण 82.47 % मतदान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here