जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आता ‘आमदार आपल्या दारी’ अभियान सुरू केले आहे. तीन महिन्यांपूर्वी जामखेड तालुक्यातील साकत व खर्डा येथे या उपक्रमाची सुरूवात केली होती. सर्व अधिकारी गावात बोलावून लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन सोडवण्यासाठी आदेश दिले होते. आता
उपक्रमांतर्गत चापडगाव-कोरेगाव आणि मिरजगाव-निमगाव या दोन जिल्हा परिषद गटांतर्गत येणाऱ्या गावांतील लोकांची भेट त्यांनी विविध गावांत जाऊ तेथील जनतेच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेतल्या.
यावेळी महसूल, कृषी, महावितरण, पंचायत समिती, पोलीस, भूमी अभिलेख आदी सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाबाबत बोलताना आ.रोहित पवार यांनी, स्वतः अधिकारीच सोबत असल्याने नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन ते जागेवरच मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. अशा उपक्रमामुळं थेट लोकांच्या अडचणी लक्षात येत असल्याने त्या वारंवार उद्भवू नयेत म्हणून काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे का, हेही लक्षात आल्याचे त्यांनी म्हंटलय.
नियमितपणे असा उपक्रम घेण्याचा माझा प्रयत्न आहे. सर्व विभागाचे अधिकारीही त्यासाठी चांगलं सहकार्य करत आहेत. त्यांच्या मदतीने एक लोकाभिमुख प्रशासन व्यवस्था निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असून त्याला यश येत मिळतंय, ही समाधानाची गोष्ट असल्याचा निर्वाळा आ.रोहित पवार यांनी यानिमित्ताने दिलाय. या उपक्रमाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. अनेक लोकांच्या अडीअडचणी मार्गी लागत आहेत.