जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार ज्योतीप्रकाश विठ्ठलराव जायकर हे सलग ३८ वर्षे सात महिने पंधरा दिवस सेवा करत आज सेवानिवृत्त झाले. दिवसभर नियमित काम करून सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांची व्हिसी जाॅइन केली. त्यामुळे सेवानिवृत्तीच्या शेवटच्या क्षणापर्यंत कामात व्यस्त होते. सेवानिवृत्ती बद्द्ल तहसीलदार कार्यालयातर्फे सत्कार करण्यात आला होता. नंतर पत्रकारांनीही सत्कार केला.
जायकर हे नायब तहसीलदार म्हणून जून २०१९ हजर झाले त्यांच्या काळात विधानसभा निवडणुक सुरळीतपणे पार पडली तसेच जामखेड निवडणूक कामकाजात जामखेड तालुका जिल्ह्यात एक नंबर ठेवला त्यामुळे तत्कालीन प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी जायकर यांचा सन्मान केला होता. आज सेवानिवृत्त झाले तरीही सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत निवडणूक उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या व्हिडिओ काॅन्फरसिंग मध्ये व्यक्त होते. यात केंद्र शासनाच्या गरूडा अॅप चे दोन दिवसात शंभर टक्के कामकाज होईल असेही जायकर यांनी सांगितले. सध्या जिल्ह्य़ात एक नंबर कामकाज जामखेडचे आहे ९३% यात मतदार केंद्राविषयी संपुर्ण माहिती आहे.
आज सेवानिवृत्त होत असल्यामुळे तहसीलदार योगेश चंद्रे, नायब तहसीलदार मनोज भोसेकर व तहसील कर्मचाऱ्यांनी जायकर यांचा सत्कार केला.

जायकर यांचा सेवानिवृत्तीबद्दल पत्रकार लियाकत शेख, सुदाम वराट व धनराज पवार यांनीही सत्कार केला व पुढील भावी जीवनाविषयी शुभेच्छा दिल्या.
