जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून कर्जतचं ग्रामदैवत असलेल्या सद्गुरू संत श्री गोदड महाराज यांची हस्तलिखित स्वरूपात विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. संत गोदड महाराजांच्या विचारांवर लोकांची आस्था, प्रेम आणि विश्वास असल्याने या ग्रंथसंपदेचं जतन करुन ती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी गोदड महाराज यांनी लिहिलेला पहिला हस्तलिखित ग्रंथ छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात आला असल्याची माहिती आमदार रोहित पवारांनी दिली.
यासाठी संत गोदड महाराज मंदिराचे मानकरी, नागरीक आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचं मोठं सहकार्य लाभतंय. त्यादृष्टीने काल गोदड महाराजांनी लिहिलेला ‘जगतारक’ हा पहिला हस्तलिखित ग्रंथ वस्तुसंग्रहालयाच्या ‘कला संवर्धन, संशोधन आणि प्रशिक्षण विभागा’कडं सुपूर्द केला.






