जामखेड नगरपरिषदेची निवडणूक वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढवणार – रामभाऊ मरगळे

0
238
जामखेड प्रतिनिधी 
          जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
आगामी जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या धर्तीवर आज जामखेड शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इच्छुक उमेदवार, नेते आणि कार्यकर्ते यांची बैठक वंचीत बहुजन आघाडीचे  नेते अँड.डॉ अरुण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व पक्ष निरीक्षक मा. रामभाऊ मरगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
   रामभाऊ मरगळे यांची पक्ष निरिक्षकपदी निवड झाल्यानंतर आज दुसरी बैठक जामखेड येथिल शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पार पडली. यावेळी येथे जेष्ठ नेते, कार्यकर्ते इच्छुक उमेदवार यांचे आगामी नगरपरिषद निवडणुकी बाबतीत मत मतांतरे जाणून घेण्यात आली. या प्रसंगी वंचीत बहुजन आघाडीचे भटके विमुक्त आघाडीचे राज्य समनव्यक अँड. डॉ अरुण जाधव यांनी मा. रामभाऊ मरगळे यांचे स्वागत केले. यावेळी वंचीत बहुजन आघाडीचे भटके विमुक्तांचे नेते अँड. डॉ अरुण जाधव, पक्षनिरीक्षक रामभाऊ मरगळे जिल्हाअध्यक्ष (दक्षिण) प्रतीक बारसे, जिल्हा सचिव योगेश साठे,जिल्हा उपाध्यक्ष भीमराव चव्हाण,जेष्ठ सल्लागार जीवन पारधे  यांनी आपले मत व्यक्त केले व सर्वांनी हातात हात मिळवत पक्षादेश पाळण्याचे व अँड. डॉ अरुण जाधवा यांच्या  माध्यमातून जामखेड नगर परिषदेच्या २१ जागा स्वबळावर लढवून जामखेड नगर परिषदेची सत्ता हस्तगत करून विकासाची गंगा आणण्याचे एकमत झाले.
  रामभाऊ मरगळे यांनी आपल्या भाषणात  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारला पाईक होऊन सर्व वंचीत घटकातील सर्व जाती जमातीतील  माणसांनी  एकत्र येऊन जामखेड नगरपरिषेदेवर वंचीत बहुजन आघाडीचा झेंडा  फडकवण्याचे आव्हान त्यांनी केले. वंचीत बहुजन आघाडी ही निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. व याबद्दलची रणनीती पक्षीय स्तरावर पूर्ण झाली आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. येणारी नगरपरिषद निवडणूक ही प्रस्थापित पक्षांना नक्कीच धडकी भरवनारी असेल असेह त्यांनी मत व्यक्त केले.
जामखेड नगरपरिषदेच्या बाबतीत पक्षाच्या प्रदेश स्तरावरून घेण्यात आलेला स्वबळाचा निर्णय मान्य करत आपल्याला स्वबळावर निवडणूक लढवायची आहे असे प्रतिपादन निरीक्षक रामभाऊ मरगळे यांनी केले. शहराच्या प्रत्येक भागात तुल्यबळ नेते, कार्यकर्ते आहेत हे विधानसभेच्या मतांवरून जाणवते, प्रत्येकाने येत्या काळात निवडणूक पक्ष अध्यक्ष आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याकडे बघून निवडणूक लढवली पाहिजे, वंचितांची सत्ता जामखेड नगरपरिषदेवर यावी हे अँड. डॉ अरुण जाधव यांचे स्वप्न उराशी बाळगून आपल्याला नगर परिषदेची सत्ता कशी हस्तगत करता येईल या दृष्टीने मार्गक्रमण करावे लागेल. कार्यकर्त्यांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता निवडणुकीत वंचीत बहुजन आघाडीचे काम करण्याचे आवाहन केले, वंचित समूहाला सत्तेत बसवण्यासाठी आदरणीय ॲड.बाळासाहेब आंबेडकर साहेब अहोरात्र झटत आहे. याचा वंचित समूहाने विचार करावा असे प्रतिपादन अँड.डॉ अरुण जाधव यांनी केले. तसेच वंचित बहुजन आघाडीशिवाय सत्तेचं समीकरण बसणार नाही हे प्रस्थापितांनि लक्षात घ्यावं असा सूचक इशारा यावेळी जाधव यांनी दिला प्रसंगी ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांनी नाराजी न बाळगता दिलेल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करायच आहे. अस आवाहन अँड. जाधव यांनी केलं.व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चव्हाण सर यांनी केले
यावेळी जामखेड शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी वंचीत बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला. यामध्ये अखिल भारतीय नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे ता. अध्यक्ष अजिनाथ शिंदे, सुधीर कदम, रवींद्र जाधव, जयओम टेकाळे मोहन शिंदे, विष्णू चव्हाण, सागर ससाणे,तान्हाजी चव्हाण, राजू सावंत, सागर शिंदे, अविनाश जाधव, आकाश शेगर, डॉ. शेख खलील तय्यब, किशोर देडे,सोहेल मदारी, जावेद मदारी अल्ताफ मदारी, आदी कार्यकरर्त्यांनी प्रवेश घेतला.
उपस्थित उमेदवारांचे म्हणणे वैयक्तिक रित्या जाणून घेत, ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांचे हि मत महत्वाचे असून तेहि जाणून घेण्यात आले. याप्रसंगी जिल्हा महासचिव योगेश साठे, वंचित बहुजन आघाडीचे जामखेड तालुकाध्यक्ष अतिश पारवे, श्रावण गंगावणे,मोहन शिंदे, विष्णू चव्हाण, सागर ससाणे,अविनाश जाधव, पोपट जाधव, श्रावण गंगावणे, संतोष जाधव, केशव जाधव, ऋषिकेश जाधव, आकाश चंदन, अनिकेत जाधव, सागर जाधव, विकी जाधव, शेखर रिटे, बबलू सातपुते, यशवंत काकडे, जयओम टेकाळे, किशोर मोहिते ,फुलाबाई शेगर, कादिर मदारी ,डॉ.शेख खलील, सुधीर कदम, नितीन आहेर ,किरण जाधव  ,वाकी चे माजी सरपंच बाळासाहेब खाडे, , भीमराव चव्हाण,  विशाल पवार, विशाल जाधव, गणेश घायतडक,लखन जाधव,संतोष जाधव, केशव जाधव, राहुल राळेभात, अमोल घायतडक,राकेश जाधव, अभिषेक जाधव, संदीप जाधव,सनी जाधव, सोनू जाधव, अनिकेत जाधव, बबलू अंधारे, विकी जाधव ,राजू जाधव, परशु जाधव, गणेश जाधव, दीपक सदाफुले,महेश ओहोळ, सूरज पवार, शहानुर काळे, सुईकाश काळे, दीपक काळे, मच्छीन्द्र अंकुश पवार, लक्ष्मण जाधव, चक्रधर शिरसाठ, भाऊसाहेब जाधव,जाधव,कल्याण आव्हाड, सुरेश आव्हाड,अतुल वाघमारे,  बाळासाहेब खाडे, सर्जेराव गंगावणे ,अक्षय समुद्र,   नितीन आहेर, राजू शिंदे, सागर भांगरे, राकेश साळवे, वैजीनाथ केसकर, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here