जामखेड पंचायत समितीचे नवनियुक्त गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार

0
293
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जामखेड पंचायत समितीमध्ये नव्याने नियुक्त झालेले गट विकास अधिकारी प्रकाश पोळ यांचा सत्कार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला.
      यावेळी बोलताना पोळ म्हणाले की, वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी नेहमी तुमच्या सोबत असेल असे त्यावेळी त्यांनी उद्गार काढले. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक ॲड.डॉ. अरुण जाधव यांनी बोलताना असे म्हटले की वंचित बहुजन आघाडी कोणत्याही चांगल्या कामासाठी नेहमी तुमच्या सोबत असेल असे यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी समता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ गव्हाळे, विस्तार अधिकारी बापूराव माने, खर्डा गावचे ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष युवराज ढेरे पाटील, सामाजिक कार्यकर्ते विक्रम डाडर, प्रमोद गव्हाळे, किरण बोऱ्हाडे, किरण जाधव, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अतिष पारवे, डवरी गोसावी समाजाचे नेते अजीनाथ शिंदे, बाबा शेगर, विशाल जाधव, मच्छिंद्र जाधव, निवारा बालगृहाचे अधीक्षक वैजिनाथ केसकर, लोकाधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल पवार, बाळगव्हान ग्रामपंचायत चे सदस्य सर्जेराव गंगावणे, राहुल दाताळ, मुकुंद घायतडक, दिपक काळे, राजू शिंदे,राकेश साळवे आदी. कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here