जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून प्रकाश पोळ यांची नियुक्ती झाली कालच त्यांनी पदभार स्वीकारला आज तालुका भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वतंत्र पणे सत्कार करण्यात आला.
भाजपाच्या वतीने सत्कार करताना पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर, कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख रवी सुरवसे
आपटीचे सरपंच नंदकुमार गोरे, अरणगावचे सरपंच लहु शिंदे, जातेगाव सरपंच पांडुरंग गर्जे, पाटोदा विकास सेवा संस्थेचे चेअरमन आशोक महारनवर, खांडवीचे सरपंच डॉ. गणेश जगताप, धोंडपारगावचे सरपंच सुखदेव शिंदे, शाहुराव जायभाय, मदन पाटिल, भास्कर गोपाळघरे, आशोक गीते, रमेश ढगे, बंडु सगळे व भाजपा पदाधीकारी
उपस्थित होते.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस तथा साकतचे सरपंच हनुमंत पाटील, प्रसिद्धी प्रमुख काकासाहेब कोल्हे, युवा नेते युवराज उगले, पै सूरज रसाळ, चेरमन बाबू आवारे, उपसरपंच बळीराम कोल्हे, प्रशांत वारे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.