Sunday, February 15, 2026
Home ताज्या बातम्या धनंजय मुंडे – करुणा शर्मांबद्दल फेसबुकवर बदनामीकारक पोस्ट; पुण्यात तक्रार दाखल

धनंजय मुंडे – करुणा शर्मांबद्दल फेसबुकवर बदनामीकारक पोस्ट; पुण्यात तक्रार दाखल

0
274
जामखेड न्युज – – – 
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे तसंच करुणा शर्मा यांच्याबद्दल फेसबुकवर बदनामीकारक पोस्ट, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार,शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत,भाजपचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांबद्दल फेसबुकवर अश्लील मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल मुळे या तरुणाने मराठा समाजात तेढ निर्माण होईल, अशा प्रकाराच्या पोस्ट सोशल माध्यम म्हणजेच फेसबुकवर केल्या आहेत. त्याच दरम्यान धनंजय मुंडे – करुणा शर्मा यांच्या नावाचा संदर्भ देऊन इतर महिलांच्या बाबतीत बदनामीकारक फोटो टाकण्यात आले आहेत.
तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत,भाजपचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, अनिल देशमुख, अमृता फडणवीस, अमोल मिटकरी, रोहित पवार या नेत्यांबद्दल फेसबुकवर अश्लील मजकूर पोस्ट केल्याची तक्रार फिर्यादी ज्ञानेश्वर बडे यांनी राहुल मुळे यांच्या विरोधात दिली आहे. त्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!