Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या गणेशोत्सवात मार्गदर्शक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे – पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड

गणेशोत्सवात मार्गदर्शक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे – पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड

0
259
जामखेड प्रतिनिधी
             जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
        आगामी गणेश उत्सवाच्या निमित्ताने जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने एक आदर्श नियमावली बनविण्यात आली असून. या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन सोशल मिडीयाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. याबाबत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सदर नियमावली जाहीर केली असून  जामखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष , गणेश मंडळ अध्यक्ष व उपाध्यक्ष, शांतता समितीचे सदस्य, सर्व मूर्तिकार बंधू, सर्व प्रकारचे वादयचालक, महिला दक्षता समिती, पत्रकार बंधू यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपल्या भागातील गणेश मंडळावर नियंत्रण ठेऊन खालील सुचनांचे पालन करून घ्यावे.
१) गणेश मंडळाने स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे त्यासाठी सार्वजनिक जागेवर मंडप लावणेची परवानगी, जागेचे नाहरकत व लाइट जोडणीचे प्रमाणपत्र घेऊन जामखेड पोलीस स्टेशनमध्ये सर्व कागदपत्रे सादर करून परवानगी घ्यावी व परवानगी घेऊनच मूर्तीची स्थापना करावी.
२) श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक गणेशमंडळा करिता ४ फुट व घरगुती गणपती २ फुटाच्या मर्यादेत असावेत. ३) यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेश मूर्ती ऐवजी घरातील धातू /संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची किंवा पर्यावरण पूरक असल्यास विसर्जन शक्य तर घरच्या घरीच करावे. ४ ) गणेशोत्सव करिता वर्गणी देणगी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा. बळजबरीने कोणीही वर्गणी जमा करणार नाही. ५) आरती करिता गर्दी होणार नाही. तसेच ध्वनिप्रदूषणाचा संदर्भात नियमांचे व तरतुदीचे पालन करण्यात यावे. ६) श्री गणेशाच्या दर्शनाच्या सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादी द्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. ७)गणपती मंडळामध्ये कोरोणा विषाणू च्या अनुषंगाने थर्मल स्कॅनिंग पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. तसेच मास्क, सॅनीटायझरचा वापर करून सोशल डिस्टंसिंग संदर्भात काळजी घ्यावी. ८) श्रींचे आगमन व विसर्जन करतेवेळी कोणत्याही प्रकारचे मिरवणुका काढण्यात येऊ नये.मिरवणूक काढल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ९) Covid-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित पोलिस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. १०) Covid-19 अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी  अहमदनगर यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे.
वरील व इतर सूचनाचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. गणेशोत्सव मंडळाची काही अडचण असल्यास खालील मोबाईल नंबर वर संपर्क करावा. पोलीस नाईक अविनाश ढेरे मो.न.8888837545, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश जाधव मो.न.8806623459 असे आवाहन जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे. तसेच यावेळी त्यांनी गणेशोत्सव निम्मित सर्व गणेश मंडळाला हार्दिक शुभेच्छा सुध्दा दिलेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!