Monday, February 16, 2026
Home ताज्या बातम्या NEET परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हा असेल ड्रेस कोड; 12 तारखेला होणार परीक्षा

NEET परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हा असेल ड्रेस कोड; 12 तारखेला होणार परीक्षा

0
430
जामखेड न्युज – – – 
राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET 2021) 12 सप्टेंबरला होणार आहे.  परंतु, पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी हजारो विद्यार्थी करत होते. मात्र, राष्ट्रीय चाचणी एजन्सीने याबाबत अद्याप कुठलीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे, ताज्या माहितीनुसार NEET UG 2021 ठरलेल्या वेळेतच देशभरात होईल, अशी माहिती मिळालेली आहे.
दरम्यान NTA ने परीक्षेसाठी विशिष्ट ड्रेस कोड लागू करण्यात आलेले आहे. जे विद्यार्थी हा ड्रेस कोड परीक्षेवेळी घालणार नाही. त्यांना परीक्षेला बसून देण्यात येणार आहे. परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे दागिने, धातूच्या वस्तू, मोबाईल फोन घेऊन जाता येणार नाही, असे नियम लागू करण्यात आले आहे.
NEET 2021 मुलींसाठीचा कसा असेल ड्रेस कोड :
1)मास्क आणि ग्ल्व्हज् घालणे बंधनकारक असणार आहे.
2) महिला विद्यार्थ्यांनी फुल हाताचे कपडे, एम्ब्रायडरी, ब्रोच किंवा मोठ्या बटणाचे कपडे घालू नये.
2)उंच टाचेचे बूट आणि मोठे खिसे असलेली जीन्स घालून परीक्षेला येऊ नये.
3)तसेच दागिने, कानातील झुमके, अंगठ्या, बांगड्या, नाकात चमकी, पायात पट्ट्या घालू नये.
NEET 2021 मुलांसाठीचा कसा असेल ड्रेस कोड :
1)मास्क आणि ग्ल्व्हज् घालणे बंधनकारक आहे.
2).पुरुष विद्यार्थ्यांना अर्ध्या हाताचे शर्ट, टी-शर्ट घालण्यास परवानगी आहे. नीट परीक्षेत संपूर्ण बाह्याचे शर्ट घालण्यास परवानगी नाही.
3).परीक्षेची मोठ्या खिशांच्या, मोठ्या बटणाचे कपडे घालण्यास परवानगी नाही.
4) पुरुष विद्यार्थ्यांना ट्राउजर घालण्यास परवानगी आहे.
5) एकाच महिन्यात येणाऱ्या परीक्षा :
NEET UG परीक्षा 13 भाषांमध्ये होणार :
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षा  NEET UG परीक्षा आता पहिल्यांदाच हिंदी, मराठी, पंजाबी, आसामी, बंगाली, उडिया, गुजराती, तेलुगु, मल्याळम, कन्नड, तामिळ, उर्दू आणि इंग्रजी अशा तेरा भाषांमध्ये घेण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!