Tuesday, October 27, 2026
Home ताज्या बातम्या वकील बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध! ADCC बँकेचे संचालक ॲड. सचिन घुमरे यांचे...

वकील बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध! ADCC बँकेचे संचालक ॲड. सचिन घुमरे यांचे आश्वासन जामखेड वकील संघाच्या वतीने नवनिर्वाचित संचालकांचा सन्मान, सुलभ कर्ज व आर्थिक सहकार्याची मागणी

0
2
वकील बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध! ADCC बँकेचे संचालक ॲड. सचिन घुमरे यांचे आश्वासन  जामखेड वकील संघाच्या वतीने नवनिर्वाचित संचालकांचा सन्मान, सुलभ कर्ज व आर्थिक सहकार्याची मागणी

जामखेड न्युज – – – – – – 

वकील बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध! ADCC बँकेचे संचालक ॲड. सचिन घुमरे यांचे आश्वासन

जामखेड वकील संघाच्या वतीने नवनिर्वाचित संचालकांचा सन्मान, सुलभ कर्ज व आर्थिक सहकार्याची मागणी

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (ADCC) संचालकपदी निवड झाल्याबद्दल जामखेड वकील संघाच्या वतीने नवनिर्वाचित संचालक ॲड. सचिन घुमरे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या वेळी वकील बांधवांच्या शेतीविषयक तसेच आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी बँकेच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन ॲड. घुमरे यांनी दिले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जामखेड वकील संघाचे अध्यक्ष ॲड. हर्षल डोके यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, वकील संघातील अनेक सदस्य शेतकरी कुटुंबातील असून त्यांना शेतीसह दैनंदिन जीवनात विविध आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत बँकेच्या माध्यमातून सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे आणि वकील संघाच्या सदस्यांना आर्थिक अडचणींच्या काळात सहकार्य करणे आवश्यक आहे. यासाठी नवनिर्वाचित संचालक ॲड. सचिन घुमरे यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वकील बांधवांना नेहमीच खंबीर साथ देणार!
सत्काराला उत्तर देताना ॲड. सचिन घुमरे म्हणाले की, माझ्या कुटुंबातील तीन सदस्य वकील संघाचे सदस्य असल्यामुळे वकिलांना त्यांच्या दैनंदिन व्यवसायात तसेच कौटुंबिक जीवनात येणाऱ्या अडचणींची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे वकील बांधवांना शक्य ते सर्व सहकार्य करण्यासाठी मी नेहमीच तत्पर राहीन. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी माझे खंबीर सहकार्य असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, आज वकील संघाच्या सर्व सदस्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून माझा जो सन्मान केला, तो माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि भावनिक आहे. हा सत्कार म्हणजे माझ्या घरातीलच सत्कार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. वकील संघाचे पदाधिकारी आणि सर्व सदस्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

 

मान्यवरांनी दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
या वेळी ॲड. कोल्हे, ॲड. बोरा, ॲड. पारे, ॲड. गोले, ॲड. काशिद आणि ॲड. निकम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी ॲड. सचिन घुमरे यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास वकील संघाचे अध्यक्ष ॲड. हर्षल डोके, उपाध्यक्ष ॲड. राळेभात, सचिव ॲड. लटपटे, ॲड. सपकाळ, ॲड. जायभय, ॲड. अनिल बारवकर, ॲड. कारंडे, ॲड. थोरात, ॲड. ढाळे, ॲड. नवनाथ घुमरे यांच्यासह जामखेडमधील अनेक ज्युनियर व वरिष्ठ वकील उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. कोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲड. आमिर पठाण यांनी मानले. वकील संघाच्या सदस्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे केलेल्या या सत्कारामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!