Tuesday, October 27, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडकरांच्या पाणीप्रश्नासाठी नगरपरिषद सरसावली! उजणीचे पाणी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न टँकरची मागणी...

जामखेडकरांच्या पाणीप्रश्नासाठी नगरपरिषद सरसावली! उजणीचे पाणी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न टँकरची मागणी करणार – नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी

0
2
जामखेडकरांच्या पाणीप्रश्नासाठी नगरपरिषद सरसावली! उजणीचे पाणी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न  टँकरची मागणी करणार – नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी

जामखेड न्युज – – – – – – 

जामखेडकरांच्या पाणीप्रश्नासाठी नगरपरिषद सरसावली! उजणीचे पाणी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

टँकरची मागणी करणार – नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी

 

जामखेड शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी जामखेड नगरपरिषद प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. शहराचा जिव्हाळ्याचा बनलेल्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उजणीचे पाणी आणण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. तसेच, तातडीचा उपाय म्हणून पाणीपुरवठ्यासाठी टँकरची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जामखेड शहरात पाणीटंचाईची तीव्रता वाढत असताना नागरिकांना नियमित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नगरपरिषदेकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन, उजणीचे पाणी आणण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणि तातडीच्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली.

उजणीचे पाणी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न!
नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी म्हणाल्या की, जामखेड शहराचा पाणीप्रश्न हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शहराला पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी उजणीचे पाणी आणण्याच्या दृष्टीने आमचे युद्धपातळीवर प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी नगरपरिषद सर्वतोपरी प्रयत्न करीत असून, नागरिकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

पाणीपुरवठा योजना लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न
सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरपरिषदेकडून विविध पर्यायांचा विचार केला जात असून, आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

२८ ऑक्टोबरच्या सभेत टँकरच्या मागणीचा प्रस्ताव
शहरातील सद्यस्थितीतील पाणीटंचाई लक्षात घेता, येत्या २८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठ्यासाठी टँकरची मागणी करण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. टँकरच्या माध्यमातून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याने या सभेकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

शहराचा पाणीप्रश्न तात्पुरत्या उपाययोजनांपुरता मर्यादित न राहता कायमस्वरूपी सुटावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे उजणीच्या पाण्याच्या प्रयत्नांना कितपत यश मिळते आणि टँकरच्या माध्यमातून नागरिकांना किती दिलासा मिळतो, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

या पत्रकार परिषदेला नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट (नाना) राळेभात, पाणीपुरवठा सभापती श्रीराम डोके, अमित चिंतामणी, प्रा. विकी घायतडक, मोहन पवार, मनोज कुलकर्णी, प्रविण होळकर आणि प्रविण चोरडिया यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

चौकट

पाणीपुरवठा योजनेसाठी मनोज कुलकर्णी यांचे योगदान!
जामखेडच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मनोज कुलकर्णी यांनी कोणताही मोबदला न घेता जागा उपलब्ध करून दिली आहे. शहराच्या पाणीप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी त्यांनी दिलेले हे योगदान महत्त्वाचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!