Sunday, February 15, 2026
Home ताज्या बातम्या मास्क कुठय तुझा,पोलिसांना सांगू का उचलायला

मास्क कुठय तुझा,पोलिसांना सांगू का उचलायला

0
398
जामखेड न्युज – – – 
कारे बाबा तुझा मास्क कुठय,पोलिसांना सांगू का उचलायला परत म्हणतान दादा लय कडक ये असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे एका कार्यक्रमात शूटिंग करणाऱ्या कॅमेरामनची चांगगलीच फिरकी घेतली अजित पवार यांच भाषण सुरू असताना त्यांना समोरचा कॅमेरामनला मास्क नसल्याचे दिसले त्यावरून त्यांनी त्याची चांगलीच फिरकी घेतली तू अस वागून शेजारच्याला अडचणीत आनशील असेही पवार यांनी यावेळी सांगितले
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपला आक्रमक स्वभाव, रोखठोक मतं, सडेतोड उत्तर देण्याची पद्धत आणि एखाद्याला दरडावण्याची स्टाईल यामुळे प्रचलित आहे. जे मनात तेच तोंडावर असा अजित पवारांचा स्वभाव आहे. त्यांच्या या स्वभावामुळे ते अनेकदा अडचणीतही आले. मात्र त्यांचा हाच स्वभाव त्यांच्या लोकप्रियतेचं खरं गमक आहे.
अजित पवार काल बारामती दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी जानाई उजव्या कालव्याच्या पाईपलाईनचं भूमीपूजन अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं. तसंच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या ‘मॅग्नेट’ प्रकल्पातंर्गत राज्यातील पहिल्या फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्राचे भूमीपूजन बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार जळोची येथे अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. या दौऱ्यात अजित पवार यांनी पियाजो कंपनीलाही भेट दिली.पियाजो कंपनीला भेट दिल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अजितदादांना आपल्या नव्या उत्पादनाबाबत माहिती दिली. नव्या इलेक्ट्रिक रिक्षाबाबत माहिती जाणून घेतल्यानंतर अजितदादांना रिक्षा चालवण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी थेट रिक्षाचं हँडल हातात घेतलं. अजितदादांनी ही रिक्षा कंपनीच्या आवारातच चालवली. अजितदादांना रिक्षा चालवताना पाहून कंपनीचे कर्मचारीही अवाक झाले होते. यावेळी अजितदादांनी या इलेक्ट्रिक रिक्षाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली आणि कंपनीच्या या उत्पादनाचं कौतुकही केलं.
‘कुटुंब मर्यादित ठेवा, उगाच फलटण नको’
येताना हरणं दिसली. पण कुणी मारायला जाऊ नका, नाहीतर चक्की पिसिंग अन पिसिंग… कुटुंब मर्यादित ठेवा, उगाच फलटण निर्माण करु नका. दोनवरच थांबा, अशा शब्दात कुटुंब नियोजनाचं आवाहनही अजिदादांनी केलंय.
सकाळी 6 वाजता काम सुरु करतो
मी सकाळी 6 वाजता काम सुरु करतो. तेव्हा काहीजण घोरत असतात. काही सुर्यमुखी तर साखरझोपेत असतात. असा टोलाही अजित पवार यांनी आपल्या उशिरा उठणाऱ्या सहकाऱ्यांना आणि विरोधकांना लगावला आहे.
अनेकजण कोट्याधीश मात्र, ते चहासुद्धा दुसऱ्याचा घेतात!
माणसाकडे पैसा असला तरी देण्याची दानत असावी लागते. अनेकजण कोट्याधीश मात्र, ते चहादेखील दुसऱ्यांना पाजायला लावतात. काहीजण श्रीमंत नसले तरी आपला परीनं मदत करतात. शोभा धारीवाल यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे. त्यांच्या विविध सामाजिक कामांमध्ये सहकार्य केलं जात आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी धारीवाल यांचं कौतुक केलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!