जामखेड न्युज – – – –
जामखेड तालुक्यात कोतवाल आरक्षणाची सोडत, कुठे महिला तर कुठे पुरुषांना संधी?
प्रांताधिकारी नितीन पाटील, तहसीलदार शितलकुमार साळवी यांच्या उपस्थितीत सोडत, चिठ्ठीद्वारे आरक्षण निश्चित
जामखेड तालुक्यातील कोतवाल पदांच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया महसूल प्रशासनाच्या उपस्थितीत पार पडली. या सोडतीमध्ये इतर मागासवर्गीय (इमाव), भटक्या जमाती ड (भ.ज.ड.), आर्थिक दुर्बल घटक आणि अराखीव प्रवर्गातील आरक्षण निश्चित करण्यात आले. काही ठिकाणी महिलांसाठी तर काही ठिकाणी पुरुषांसाठी जागा निश्चित झाल्याने संबंधित गावांतील इच्छुक उमेदवारांचे लक्ष आता पुढील भरती प्रक्रियेकडे लागले आहे. पुढील प्रक्रिया वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल.

या आरक्षण सोडतीसाठी प्रांताधिकारी नितीन पाटील, तहसीलदार शितलकुमार साळवी, नायब तहसीलदार किशोर त्र्यंबके, स्विटी तळपे व सहायक महसूल अधिकारी उपस्थित होते. कु. मुन्न्जा सलीम बागवान या मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण सोडत करण्यात आली.
कोणत्या प्रवर्गासाठी कुठे आरक्षण?

१. इतर मागासवर्गीय (इमाव) प्रवर्ग
खर्डा : महिला
पिंपळगाव आळवा : पुरुष
२. भटक्या जमाती ड (भ.ज.ड.) प्रवर्ग
तेलंगशी : पुरुष
३. आर्थिक दुर्बल घटक प्रवर्ग
साकत : पुरुष
४. अराखीव प्रवर्ग
पिंपरखेड : महिला
बांधखडक : पुरुष
नान्नज : पुरुष

सात गावांतील आरक्षण चर्चेत
जामखेड तालुक्यातील तेलंगशी, खर्डा, साकत, बांधखडक, पिंपळगाव आळवा, पिंपरखेड आणि नान्नज या गावांतील कोतवाल पदांच्या आरक्षणाबाबत इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता आहे.




