जामखेड प्रतिनिधी
दिघोळ ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभागनिहाय दूरंगी, तिरंगी लढत होत असून प्रभाग तीन व चारमध्ये माजी पंचायत समिती सदस्य मनोज राजगुरू व पवन डावकर यांच्या बजरंगबली मंडळाने जोरदार शक्तिप्रदर्शन करून प्रचाराचा नारळ वाढवला आहे.
दिघोळ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी माजी पंचायत समितीचे सदस्य मनोज राजगुरू माजी सरपंच दत्तात्रेय होनमाने व युवक नेते पवन डावकर व भिमराव गिते यांनी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसकडे न जाता स्वतंत्र बजरंगबली पॅनेल उभे केले आहे. या मंडळाने दिघोळ येथील हजारो महिला, युवक व पुरुषांच्या उपस्थित वाजत गाजत सकाळी साडेआठ वाजता दिघोळ गावातून मिरवणूक काढली. या मिरवणुकीत मतदारांत मोठा उत्साह होता प्रमुख कार्यकर्ते विजयाच्या घोषणा देत मारूती मंदीरात आले. यावेळी पॅनेलप्रमुख दत्तात्रय होनमाने, पवन डावकर, मनोज राजगुरू यांनी उपस्थित जनसमुदायाला साक्षी ठेवून प्रचाराचा नारळ वाढवला आहे.
बजरंगबली पॅनेलने प्रभाग एक, तीन व चारमध्ये स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. प्रभाग एकमध्ये मोहन अरूण गिते, रेखा अर्जुन गिते, भाग्यश्री ज्ञानेश्वर तागड, प्रभाग तीनमध्ये रंजना पिराजी दगडे, भारत सोनबा तागड, व प्रभाग चारमध्ये सर्वसाधरण जागेसाठी पवन नंदकुमार डावकर, अनुसूचित जाती जागेसाठी दशरथ कचरू राजगुरू व सर्वसाधारण महिला जागेसाठी सविता संतोष शिंदे असे तीन प्रभागात आठ उमेदवार उभे केले आहे या सर्वांनी बजरंगबलीचे दर्शन घेऊन पॅनेलला विजयी करण्याचे साकडे घातले.
पॅनेलप्रमुख पवन डावकर, दत्तात्रय होनमाने, मनोज राजगुरू, भिमराव गिते यांनी निवडणूक बाबत भूमिका मांडली. माजी पंचायत समिती सदस्य मनोज राजगुरू म्हणाले आमच्या मंडळाचे सर्व उमेदवारांची कोरी पाटी आहे कोणी काय केले हे न पाहता गावचा विकास हे एकच ध्येय ठेवून पॅनेल उभे केले आहे. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आमचे आठ उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.