Monday, October 12, 2026
Home शैक्षणिक बातम्या रांगोळीच्या रंगांतून सामाजिक संदेश अन् सेवाभावाचा जागर! ल. ना. होशिंग विद्यालयात...

रांगोळीच्या रंगांतून सामाजिक संदेश अन् सेवाभावाचा जागर! ल. ना. होशिंग विद्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

0
2
रांगोळीच्या रंगांतून सामाजिक संदेश अन् सेवाभावाचा जागर!  ल. ना. होशिंग विद्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

जामखेड न्युज – – – – – 

रांगोळीच्या रंगांतून सामाजिक संदेश अन् सेवाभावाचा जागर!

ल. ना. होशिंग विद्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव, सर्जनशीलता आणि सेवाभावाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

रांगोळीच्या माध्यमातून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांना आपली कलाकृती सादर करण्याची संधी मिळणार आहे. भारतीय संस्कृतीतील कलापरंपरेची ओळख करून देतानाच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

या कार्यक्रमाला नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी, गटशिक्षणाधिकारी धनंजय बोंदार्डे, ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, भाजप शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद, नगरसेवक मोहन पवार, सत्यशिलाताई खराडे, मीरा तंटक, माऊली अंदुरे, विजय कुलकर्णी, डॉ. बांगर, विद्यालयाचे प्राचार्य बी. ए. पारखे, पर्यवेक्षक सुदाम वराट, बबन राठोड, नरेंद्र डहाळे, विशाल पोले, निलेश भोसले, साई भोसले, वंदना अल्हाट , भोंडवे मॅडम, साळवे मॅडम आणि धर्मे मॅडम यांच्यासह शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी विकासकामांतून प्रेरणा घ्यावी – प्रांजलताई चिंतामणी
नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना देशाच्या विकासात विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे भारताला जागतिक स्तरावर मान-सन्मान मिळत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थी हे देशाचे उद्याचे भविष्य असून, रांगोळीसारख्या कलामाध्यमांतून विकासकामांची प्रेरणा आणि सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडता येतात, असे त्यांनी नमूद केले.

मुलींबरोबर मुलांना प्रत्येक कार्यक्रमात सहभागी करुन घ्या – बोंदार्डे
गटशिक्षणाधिकारी धनंजय बोंदार्डे यांनी सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन आपुलकी’ उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना प्रत्येक कार्यक्रमात सहभागी करून घेतल्यास त्यांच्यात आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव वाढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. धनगरवस्ती शाळेसाठी तीन वर्षांत २२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

स्पर्धांमधून समाजसेवेची प्रेरणा मिळते – प्रा. मधुकर राळेभात
ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे महत्त्व अधोरेखित केले. आपल्या पंचवीस वर्षांच्या सेवाकाळातील अनुभवांचा संदर्भ देत विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यशावर समाधान न मानता सामाजिक कार्यातही सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. घरातील कामांमध्ये मुला-मुलींनी आई-वडिलांना मदत करावी. अशा छोट्या कृतींतूनच सेवाभावाची सुरुवात होते आणि समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.

अमृत महोत्सवी वर्षात विविध स्पर्धांची मेजवानी – प्राचार्य पारखे
विद्यालयाचे प्राचार्य बी. ए. पारखे यांनी विद्यालयात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन तसेच इतर विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यात येणार आहे. विद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांना विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक सुदाम वराट यांनी सूत्रसंचालन सुप्रिया घायतडक यांनी तर आभार संगिता दराडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!