Home ताज्या बातम्या मनोज जरांगे पाटील यांच्या जामखेड दौऱ्याच्या नियोजनासाठी आज बैठक, तालुक्यातील समाजबांधवांना उपस्थितीचे...

मनोज जरांगे पाटील यांच्या जामखेड दौऱ्याच्या नियोजनासाठी आज बैठक, तालुक्यातील समाजबांधवांना उपस्थितीचे आवाहन

0
6
मनोज जरांगे पाटील यांच्या जामखेड दौऱ्याच्या नियोजनासाठी आज बैठक, तालुक्यातील समाजबांधवांना उपस्थितीचे आवाहन

जामखेड न्युज – – – – – 

मनोज जरांगे पाटील यांच्या जामखेड दौऱ्याच्या नियोजनासाठी आज बैठक, तालुक्यातील समाजबांधवांना उपस्थितीचे आवाहन

संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी जामखेड तालुक्यातून मुंबईकडे जाणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वागत, मार्गावरील नियोजन तसेच संपूर्ण दौऱ्याचे व्यवस्थापन याबाबत चर्चा करण्यासाठी आज, रविवार दि. १३ सप्टेंबर रोजी जामखेड तालुका नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही बैठक सायंकाळी ५ वाजता बीड रोडवरील समर्थ प्युअर व्हेज येथे होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी तालुक्यातील विविध ठिकाणांहून समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता असून, त्यांच्या स्वागताचे नियोजन शिस्तबद्ध आणि प्रभावी पद्धतीने करण्यासाठी बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.

मनोज जरांगे पाटील हे १६ सप्टेंबर रोजी मुंबईकडे रवाना होत असताना जामखेड तालुक्यातून जाणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या मार्गावरील स्वागत व्यवस्था, उपस्थितीचे नियोजन, वाहतूक व इतर आवश्यक बाबींवर बैठकीत चर्चा होणार आहे.

या नियोजन बैठकीस जामखेड तालुक्यातील सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नियोजनात सहभागी व्हावे, असे आवाहन अखंड मराठा समाज, जामखेड तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.

बैठकीचा तपशील :
📅 दिनांक : रविवार, १३ सप्टेंबर २०२६
⏰ वेळ : सायंकाळी ५.०० वाजता
📍 स्थळ : समर्थ प्युअर व्हेज, बीड रोड, जामखेड
🚩 एकजूट • नियोजन • स्वागत 🚩
विनीत : अखंड मराठा समाज, जामखेड तालुका

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!