Saturday, September 12, 2026
Home ताज्या बातम्या अहिल्यानगरमध्ये DJ चा आवाज थांबणार! गणेशोत्सव ते दसऱ्यापर्यंत DJ-डॉल्बीवर जिल्ह्यात संपूर्ण बंदी,...

अहिल्यानगरमध्ये DJ चा आवाज थांबणार! गणेशोत्सव ते दसऱ्यापर्यंत DJ-डॉल्बीवर जिल्ह्यात संपूर्ण बंदी, प्रशासनाचा कडक आदेश

0
2
अहिल्यानगरमध्ये DJ चा आवाज थांबणार! गणेशोत्सव ते दसऱ्यापर्यंत DJ-डॉल्बीवर जिल्ह्यात संपूर्ण बंदी, प्रशासनाचा कडक आदेश

जामखेड न्युज – – – – – – – 

अहिल्यानगरमध्ये DJ चा आवाज थांबणार! गणेशोत्सव ते दसऱ्यापर्यंत DJ-डॉल्बीवर जिल्ह्यात संपूर्ण बंदी, प्रशासनाचा कडक आदेश

गणेशोत्सव आणि दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात १४ सप्टेंबर २०२६ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत DJ आणि डॉल्बी साउंड सिस्टमच्या वापरावर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. याबाबत अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी १३ सप्टेंबर २०२६ रोजी मनाई आदेश जारी केला आहे.

या आदेशामुळे आगामी गणेशोत्सव, विविध धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका आणि दसरा उत्सवाच्या काळात DJ-डॉल्बीचा दणदणाट ऐकू येणार नाही. जिल्ह्यात शांतता, सार्वजनिक आरोग्य आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

DJ वाजविणेच नव्हे, भाड्याने देण्यावरही बंदी
प्रशासनाच्या आदेशानुसार निर्धारित कालावधीत DJ/डॉल्बी साउंड सिस्टम लावणे, वापरणे तसेच ती भाड्याने देणे किंवा उपलब्ध करून देणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. कोणत्याही कार्यक्रमात, मिरवणुकीत किंवा उत्सवात नियमांचे उल्लंघन करून ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर केल्यास संबंधितांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

नियम मोडल्यास कडक कायदेशीर कारवाई
मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर BNSS कलम १६३(१) आणि BNS कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश मंडळे, आयोजक, DJ चालक तसेच साउंड सिस्टम मालकांनी आदेशाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ढोल-ताशांना परवानगी, मात्र ध्वनीमर्यादा बंधनकारक
DJ आणि डॉल्बीवर बंदी असली तरी पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशा यांना नियमानुसार परवानगी राहणार आहे. मात्र त्यासाठीही शासनाने निर्धारित केलेल्या ध्वनीमर्यादेचे पालन करणे बंधनकारक असेल.

गणेशोत्सव आणि दसरा हे सण उत्साहात साजरे करताना ध्वनीप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये तसेच सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी नागरिकांनी आणि गणेश मंडळांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

दादासाहेब गिते
अपर जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!