जामखेड प्रतिनिधी
कर्जत-जामखेड मतदारसंघातील लोकांना पिण्यासाठी व वापरासाठी पाणी विकत घ्यावे लागते हे मोठे दुर्दैव आहे. लवकरात लवकर कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडविला जाईल तसेच शहरातील सांडपाण्याचे सुयोग्य नियोजन करून जामखेडची जीवनवाहिनी विंचरणा नदीचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. नागरीकांनी नदीमध्ये प्लास्टिक व कसलीही कचरा टाकू नये स्वच्छतेच्या बाबतीत आपण शेवटून पाचवे आता प्रथम क्रमांक आणावयाचा आहे तसेच कर्जत जामखेड मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर बालविवाह होतात ते रोखण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन सुनंदाताई पवार यांनी केले.
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार दिनानिमित्त सृजन फाउंडेशन मार्फत पत्रकारांचा सहकुटुंब स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनंदाताई पवार होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, डॉ. राजेश मोरे, संजय सस्ते, ओम कट्टे, पत्रकार दत्तात्रय वडे, कल्याणी नागोरे, नासीर पठाण, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अशोक निमोणकर, मिठूलाल नवलाखा, सुदाम वराट, प्रकाश खंडागळे,अविनाश बोधले, मोहिद्दीन तांबोळी, दिपक देवमाने, दत्तात्रय राऊत,, थे
संदेश हजारे, संतोष थोरात, दत्तराज पवार, ओंकार दळवी, सत्तार शेख, लियाकत शेख, यासीन शेख, पप्पूभाई सय्यद, नंदुसिंग परदेशी, किरण रेडे, औचरे, धनंजय पवार, रोहित राजगुरू यांच्या सह अनेक पत्रकार उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुनंदाताई पवार म्हणाल्या की, कर्जत जामखेड मतदार संघात ग्रामीण भागात आजही मोठय़ा प्रमाणात बालविवाह होतात. यामुळे भविष्यात या नवदापंत्याच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात पत्रकार व सृजन फाउंडेशन मार्फत आपल्याला हे बालविवाह रोखायचे आहेत. तसेच जामखेड मधील महिलांना स्वतः च्या पायावर उभे करण्यासाठी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यात येणार आहेत. मतदारसंघातील सर्वच पानंद रस्त्याचे काम हाती घेऊन रस्ते तयार करण्यात येणार आहेत.