Saturday, May 30, 2026
Home ताज्या बातम्या ल.ना.होशिंग उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा

ल.ना.होशिंग उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा

0
2

जामखेड न्युज – – – – – – 

ल.ना.होशिंग उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा

 

इयत्ता दहावी नंतर पुढे काय करायचे कोणत्या शाळेत कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे, कोणती शाखा निवडायची इयत्ता दहावीला विद्यार्थ्याला किती मार्क मिळतील असे पालकांना असंख्य प्रश्न होते. मे च्या पहिल्या आठवड्यात इयत्ता दहावीचा निकाल लागला विद्यार्थ्यांना मार्क खूप चांगले मिळाले आता पुढे काय हा मोठा प्रश्न सर्वच विद्यार्थी व पालकांपुढे होता.

खूप विद्यार्थ्यांनी ल.ना. होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये रांगा लावून नाव नोंदणी केली व प्रथम यादी कधी लागते याकडे सर्वांचे लक्ष होते परंतु आज 29 मेला प्रथम यादी लागली आणि ज्या विद्यार्थ्यांचे यादीत नाव आले त्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली.त्यामुळे कॉलेजमध्ये सकाळपासूनच गर्दी होती विद्यार्थी,पालक सर्वांचेच लक्ष होते.

विशेष म्हणजे बहुतांशी पालकांनी कागदपत्राची बऱ्यापैकी तयारी आधीच केलेली होती आज अकरा वाजता यादी जाहीर झाल्याबरोबर अकरावी सायन्स,आर्ट,कॉमर्स या तिन्ही संख्येला विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायला सुरुवात केली.
कॉलेजचे प्राध्यापक गेल्या महिन्यात भरापासूनही या प्रवेश प्रक्रियेची तयारी करत होते.

ऊन असतानाही विद्यार्थ्यांपुढे उन्हाची परवा न करता कॉलेजमध्ये प्रवेशाच्या कामासाठी येऊन बसत होते. व ग्रामीण भागातील आलेल्या पालकांना, विद्यार्थ्यांना प्राध्यापक वर्ग व्यवस्थित मार्गदर्शन करत होते.त्यामुळे पालकांमध्ये खूप समाधानाचे वातावरण होते.
महत्त्वाचा भाग म्हणजे आज ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये अतिशय उत्साही वातावरणामध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली.

यासाठी मार्गदर्शक म्हणून विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य बाळासाहेब पारखे,उपप्राचार्य युवराज भोसले यांनी अतिशय महत्त्वपूर्ण काम प्राध्यापक वर्गांच्या सहकार्याने केले. या सर्व प्रक्रियेमध्ये विज्ञान शाखा शिरसाट आजिनाथ, होमकर सुरेखा,जयश्री खळे, साबळे स्वाती,वाकळे, सचिन,धुमाळ विनोद,पवार संकेत कला शाखा कोहक राजेंद्र,इतिहास विभाग प्रमुख आघाव विश्वनाथ,सतीश डुचे,भोगील भाऊसाहेब, क्रीडा शिक्षक प्रल्हाद साळुंखे,धीरज पाटील,वंदना पोकळे,प्रमिला भोईटे योगिता व वाणिज्य शाखा समुद्र संजय,शेटे संभाजी,पानसरे ऐश्वर्या त्याचबरोबर मुख्य लिपिक ईश्वर कोळी, बाबासाहेब धनवडे भाऊसाहेब, प्रयोगशाळा सहाय्यक संतोष देशमुख व प्रवीण कुलकर्णी, सचिन शेटे,मंगेश सावंत व साई भोसले यांचीही खूप मदत झाली.

तालुक्यातील उत्कृष्ट कॉलेज ल.ना.होशिंग माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी रांगा करून घेतलेला प्रवेश हा अतिशय महत्त्वपूर्ण भाग होय. संस्थेला 75 वर्षे पूर्ण होताना जामखेड तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी सुरू झालेले कॉलेज आज उत्तम प्राध्यापक वर्ग, शिस्त,सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे,कॉलेजची प्रशस्त,आनंदी इमारत, सर्व उत्तम लॅब,उत्तम ग्रंथालय सर्व सोयींनी युक्त व महत्त्वाचा भाग यामध्ये राजस्व अभियान याचे उत्तम प्रकारे कार्य विद्यालयातून होते.

विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले राजस्व अभियाना अंतर्गत याचं काम प्राध्यापक विश्वनाथ आघाव व पोपट जगदाळे पाहतात त्यामुळे ग्रामीण भागातल्या अनेक विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होतो.अशामुळे ल.ना. होशिंग कॉलेज निश्चित प्रगतीपथावर आहे त्यामुळे संस्थेला जामखेड व तालुक्यातील सर्वांनाच याचा अभिमान आहे.

त्यामुळे दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख,उपाध्यक्ष दिलीप गुगळे,सचिव अरुणशेठ चिंतामणी,सहसचिव डॉक्टर सुनील कटारिया सर्व संचालक मंडळ त्याचबरोबर माजी सचिव शशिकांत देशमुख व माजी खजिनदार राजेश मोरे या सर्वांनीच प्राचार्य बाळासाहेब पारखे, उपप्राचार्य युवराज भोसले व सर्व प्राध्यापकांचे खूप खूप कौतुक व अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!