जामखेड न्युज – – – – – –
जामखेडमध्ये पान मसाल्याचा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
एकावर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल, पान मसाला व गुटखा विक्रेत्यांचे धाबे
जामखेड पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत मोठ्या प्रमाणात पान मसाल्याचा साठा जप्त केला असून या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जामखेड ते मोरेवस्ती रोडलगत प्रोफेसर कॉलनी परिसरात करण्यात आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 299/2026 अन्वये भा.न्या. संहितेतील कलम 123, 223, 274, 275 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई बाळु शांतीलाल खाडे यांनी फिर्याद दिली असून आरोपी म्हणून बाळु उर्फ शिवदत्त नंदकुमार मोहिते रा. बोराटे वस्ती, जामखेड याचे नाव नमूद करण्यात आले आहे.

दि. 15 मे रोजी रात्री सुमारे 10.25 वाजता ही कारवाई करण्यात आली. भेट देत पंचनामा केला.कारवाईदरम्यान डायरेक्टर स्पेशल, विमल, सुपर साऊंड व सम्राट या विविध कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात पान मसाला जप्त करण्यात आला.

जप्त मुद्देमालामध्ये शेकडो सिलबंद पाकिटांचा समावेश असून त्याची किंमत लाखोंमध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास जामखेड पोलीस करीत आहेत.यावेळी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, पो. कॉ. बाळु खाडे, पो. कॉ. वैजिनाथ मिसाळ, पो. कॉ. धनराज बिराजदार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.





