Tuesday, May 12, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड तालुक्यात सोमवार ठरला घातवार, वेगवेगळ्या अपघातात पाच जणांचा मृत्यू

जामखेड तालुक्यात सोमवार ठरला घातवार, वेगवेगळ्या अपघातात पाच जणांचा मृत्यू

0
2

जामखेड न्युज – – – – – – 

जामखेड तालुक्यात सोमवार ठरला घातवार, वेगवेगळ्या अपघातात पाच जणांचा मृत्यू

जामखेड तालुक्यासाठी सोमवार घातवार ठरला कारण वेगवेगळ्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

पुण्याहून लग्नासाठी जामखेड ला आलेले तरूण परत पुण्याला जात असताना माहिजळगाव-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघातात जामखेड येथील अँड. विराज भगवान जायभाय (वय अंदाजे २५) व सोनू डुचे (वय अंदाजे २४) या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तसेच
जामखेड तालुक्यातील तरडगाव येथे एका तरुण आईसह तिच्या दीड वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली तसेच तालुक्यातील अरणगाव येथे रस्त्याच्या कडेने चालत असताना दत्तात्रय मारुती सोले पाटील वय 58 यांना बुलेट गाडीने उठविले यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अशा प्रकारे सोमवारी पाच जणांचा मृत्यू झाला जामखेड साठी सोमवार घातवार ठरला यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली

जामखेड येथील ज्येष्ठ विधिज्ञ अँड. भगवान जायभाय यांचे सुपुत्र अँड. विराज जायभाय हे पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते. मोठ्या भावाच्या विवाहासाठी ते जामखेड येथे आले होते. विवाह सोहळा आटोपल्यानंतर दि. ११ रोजी रात्री विराज जायभाय, सोनू डुचे व पुणे येथील एक मित्र असे तिघेजण पुण्याकडे निघाले होते.

जामखेड तालुक्यातील तरडगाव येथे एका तरुण आईसह तिच्या दीड वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे तरडगाव, वंजारवाडी सह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मृतांमध्ये साळु शिवाजी चौरे (वय २३) व तिचा दीड वर्षीय मुलगा विवांश शिवाजी चौरे यांचा समावेश आहे. तरडगाव येथील दत्तुबा ढाळे यांच्या शेतातील विहिरीत आज सकाळी दोघांचे मृतदेह आढळून आले. ग्रामस्थांना विहिरीत काहीतरी तरंगताना दिसल्या नंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर नागरिकांनी तातडीने धाव घेत दोघांचे मृतदेह बाहेर काढले.

दोघांना त्वरित ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. आईच्या कुशीत वाढणाऱ्या चिमुकल्याचाही अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

तालुक्यातील अरणगाव येथील दत्तात्रय मारुती सोले पाटील वय 58 यांचं अपघाती निधन झाले. अशा प्रकारे जामखेड साठी सोमवार घातवार ठरला यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!