विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या घवघवीत यशाबद्दल जामखेड शहरमंडल भाजपाच्या वतीने आनंदोत्सव
फटाक्यांची आतषबाजी व पेढे भरवत विजयोत्सव साजरा
देशातील पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकीतील तसेच राज्यातील पोटनिवडणुकीत भाजपाच्या घवघवीत यशाबद्दल जामखेड शहरमंडल व ग्रामीण मंडल भाजपाच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत, घोषणाबाजी करत विजयोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावेळी भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद,तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवानराव मुरूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विष्णू भोंडवे, माजी तालुकाध्यक्ष अजय काशिद, दत्ता वारे, नगरपरिषद भाजपा गटनेते तात्याराम पोकळे, डॉ. अल्ताफ शेख, नगरसेवक पवन राळेभात, अर्जुन म्हेत्रे, मनोज कुलकर्णी, मोहन पवार, रवी सुरवसे, अनंता खेत्रे, गोरख घनवट, माऊली अंदुरे, मोहन (मामा) गडदे, अनिल यादव, बाळासाहेब गायकवाड, राहुल चोरगे,नागराज मुरुमकर, प्रा.संजय राऊत यांच्या सह अनेक भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत व पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (भाजपा) अनेक ठिकाणी बहुमत मिळाल्याबद्दल भाजपा शहरमंडलाच्या वतीने कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी, घोषणांचा जल्लोष करण्यात आला. यावेळी एकमेकांना पेढे भरवत विजयोत्सव साजरा केला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभापती प्रा राम शिंदे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा प्रकारे घोषणाबाजी करत परिसर दणाणून टाकला.
जय श्रीराम’चे नारे देत, भगवे झेंडे व भाजपाचा झेंडा फडकावत जामखेड भाजपा पदाधिकारी यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष केला. यावेळी अनेक भाजपा पदाधिकारी यांनी विजयाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.