नवीन पेन्शन चहासाठी पण पुरती नाही – सुदाम वराट जामखेडमध्ये कर्मचारी संपामुळे शाळा, शासकीय कार्यालये ओस एकच मिशन जुनी पेन्शन च्या घोषणेने दुमदुमला परिसर
जामखेडमध्ये कर्मचारी संपामुळे शाळा, शासकीय कार्यालये ओस
एकच मिशन जुनी पेन्शन च्या घोषणेने दुमदुमला परिसर
आमदार खासदार यांनी शपथ घेतली की आयुष्य भर पेन्शन मिळते पण कर्मचारी तीस वर्षे सेवा करूनही पेन्शन मिळत नाही ही मोठी शोकांतिका आहे. काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत पेन्शन १५०० ते अठराशे रूपये मिळत आहे. यात कसा घरखर्च भागवयाचा मिळणारी पेन्शन चहा साठी सुद्धा पुरणार नाही असे मत माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट यांनी व्यक्त केले.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी आज मंगळवार २१ एप्रिलपासून राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली या संपात राज्यातील तब्बल १७ लाख कर्मचारी सहभागी झाले आहेत. जामखेड तालुक्यातील शिक्षक, शिक्षकेत्तर, आरोग्य, महसूल यासह अनेक विभागातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. यामुळे आज दिवसभर शाळा, तहसील कार्यालय, कृषी, आरोग्य विभागाची कार्यालये ठप्प झाले होते. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच राहणार असा निर्धार समन्वय समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
आज माध्यमिक शिक्षक सकाळी दहा वाजता ल. ना. होशिंग विद्यालयात जमा झाले व समुहाने एकत्रित तहसील कार्यालयात जमा झाले. समन्वय समिती चे अध्यक्ष मच्छिंद्र पाडळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी अध्यक्ष पी. टी. गायकवाड, दिलीप ढवळे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट, सचिव संतोष पवार, उपाध्यक्ष जाकिर शेख, सहसचिव भागवत चांगुणे, अमोल भोंडवे, खजिनदार हनुमंत वराट, भाऊसाहेब इथापे, रामेश्वर धुमाळ, अर्जुन रासकर, सुनील घाडगे, मयूर भोसले, विशाल पोले, आदित्य देशमुख, दिनकर सरगर, बुवासाहेब दहिकर, शिक्षकेत्तर संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख, बाबासाहेब धनवडे, महसूलचे नंदुरबार गव्हाणे, विकास मोराळे, गोडगे, आरोग्य विभागाचे गर्जे, यांच्या सह माध्यमिक शिक्षक, महसूल कर्मचारी, आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना जाकिर शेख म्हणाले की, विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आज पासून बेमुदत संपावर जात आहोत. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहिल.
यावेळी बोलताना शिक्षकेत्तर संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख म्हणाले की सध्या कर्मचारी भरती बंद आहे यामुळे खुपच ताण निर्माण होत आहे. ताबडतोब जुनी पेन्शन व कर्मचारी भरती करावी अशी मागणी केली.
यावेळी तहसीलदार तथा समन्वय समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र पाडळे म्हणाले की, शासकीय कर्मचारी, शिक्षक संपात सहभागी आहेत यामुळे कामकाज ठप्प झाले आहे. आलेले निवेदन शासनाकडे पाठवले जाईल असे सांगितले. यावेळी एकच मिशन जुनी पेन्शन यासह
दीर्घकाळ आंदोलन, संप आणि निवेदनांनंतरही शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी आता निर्णायक लढ्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील सर्व कार्यालये शाळा ओस पडल्या होत्या.
या प्रमुख मागण्यांसाठी संपाची हाक कर्मचारी संघटनांनी जुनी पेन्शन योजना लागू करणे, सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची तात्काळ अधिसूचना, कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, चतुर्थश्रेणी व वाहनचालक भरतीवरील बंदी उठविणे, कॅशलेस आरोग्य सुविधा, अनुकंपा नियुक्त्या, पीएफआरडीए कायदा रद्द, तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. या मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे. निवेदन देताना एकच मिशन जुनी पेन्शन मागणीने परिसर दुमदुमून गेला आहे.