Wednesday, April 8, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड तालुक्याचा वसूल ५१.४३ टक्के, जिल्हा बँकेने केला ११३११ कोटीच्या ठेवीचा विक्रम

जामखेड तालुक्याचा वसूल ५१.४३ टक्के, जिल्हा बँकेने केला ११३११ कोटीच्या ठेवीचा विक्रम

0
2

जामखेड न्युज——

जामखेड तालुक्याचा वसूल ५१.४३ टक्के, जिल्हा बँकेने केला ११३११ कोटीच्या ठेवीचा विक्रम

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जामखेड तालुक्याची मार्च २०२६ अखेर बँकेची कर्ज वसुली ५१.४३ टक्के झाली असून जामखेड तालुक्याच्या ठेवीत चांगल्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जामखेड तालुक्यातील शेतकरी सभासदांनी अत्यंत चांगल्या प्रकारे कर्जाचा भरणा केला असल्याची माहिती जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल दादा राळेभात यांनी दिली.

यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि, जिल्हा बँक आशिया खंडात अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते आणि हीच ओळख दृढ करण्याचे काम बँकेचे चेअरमन चंद्रशेखर (भाऊ) घुले पाटील, व्हा.चेअरमन व सर्व संचालक मंडळ करत असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.चेअरमन चंद्रशेखर(भाऊ) घुले पाटील,व्हा.चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली व खातेदारांनी बँकेवर विश्वास ठेवून केलेल्या गुंतवणुकीमुळे बँकेने मार्च २०२६ अखेर ठेवींमध्ये विक्रमी वाढ नोंदवत ११३११ कोटीच्या ठेवीचा टप्पा पार केला आहे. 

त्याचप्रमाणे सोनेतारण कर्ज सुविधेमध्ये बदल करून कर्ज मर्यादा प्रति व्यक्ती ५ लाख करून ग्राहकांना ८ टक्के दराने कर्ज पुरवठा केला जात आहे. जामखेड तालुक्यात ५ शाखेमध्ये सोनेतारण कर्ज सुविधा सुरु असून अरणगाव शाखेमध्ये नव्याने सोनेतारण कर्ज सुविधा सुरु केलेली आहे. जिल्हा बँक डिजिटल सेवेमध्ये आघाडीवर असून बँकेच्या फोन पे, मोबाइल बँकिंग, गुगल पे या सुविधा कार्यरत असून बँक लवकरच व्यावसायिकांसाठी बारकोड सुविधा सुरु करणार आहे.

रिझर्व्ह बँक व नाबार्डने ठरवून दिलेल्या बँकिंग क्षेत्रातील नियम व निकषानुसार बँकेचे कामकाज चालत असल्याची माहिती राळेभात साहेब यांनी सांगितले.

कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार मा.श्री रोहित (दादा) पवार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असल्याचे मत व्यक्त करून जामखेड तालुक्यात बँक पातळीवर १०० टक्के वसूल झालेल्या एकमेव मोहा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन महादेव देडे, सचिव दिपक नेटके यांचा जिल्हा सहकारी बँकेच्या लोकनेते जगन्नाथ (तात्या) राळेभात पाटील सभागृहात सत्कार करण्यात आला.

यावेळी मार्केट कमिटी संचालक विठ्ठल चव्हाण, गजानन शिंदे, जामखेड संस्थेचे चेअरमन अंकुश कोल्हे, तालुका सचिव नितीन सपकाळ, तालुका विकास अधिकारी दरगुडे साहेब व इतर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!