कार्यकर्त्यांच्या बळावर भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष – शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद
जामखेड येथे भाजपा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात पेढे वाटून
पक्षाच्या स्थापनेत देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह श्यामाप्रसाद मुखर्जी तसेच अनेक ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांचे मोठे योगदान आहे. २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाचे नवे पर्व सुरू झाले. सामान्य माणसाच्या कल्याणासाठी अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळेच आज भाजपा केवळ देशातच नव्हे, तर जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जात आहे.पक्षाची ताकद ही कार्यकर्त्यांमध्ये आहे.
प्रत्येक कार्यकर्त्याने ‘प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि आपण स्वतः’ या तत्त्वावर काम केले, तर देश अधिक सक्षम होईल, आगामी काळातही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत विकासाची गती कायम ठेवू असे मत भाजपा मंडलाध्यक्ष संजय काशिद यांनी सांगितले.
प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि आपण स्वतःया त्रिसूत्रीवर ६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आज पक्षाचा ४७वा स्थापना दिवस (४६वा वर्धापन दिन) जामखेड येथे पेढे वाटून उत्साहात साजरा करण्यात आला.
शहरातील मा.सभापती प्रा. राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. भाजपा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी एकत्र येत पक्षाच्या विचारधारेचा पुनरुच्चार केला. यावेळी ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देत भाजपा कार्यरत आहे.देश टिकला तर पक्ष टिकेल आणि पक्ष टिकला तर माणूस टिकेल या विचारावर पक्षाची वाटचाल सुरू आहे. हिंदुत्व टिकले पाहिजे, देशातील जनता गुण्यागोविंदाने राहिली पाहिजे आणि देशाच्या प्रगतीसाठी सर्वसामान्यांनी हातभार लावावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी भाजपा मंडल अध्यक्ष संजय काशिद,ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात,सभापती पै. शरद कार्ले, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, भाजपा गटनेते तात्याराम पोकळे, ॲड. अजय काशिद, संचालक वैजिनाथ पाटील, संचालक रविंद्र हुलगुंडे,दत्तात्रय राऊत,अनिल यादव, नगरसेवक प्रवीण चोरडिया, नगरसेवक श्रीराम डोके, नगरसेवक हर्षद काळे,माजी नगरसेवक दिगंबर चव्हाण, अमित जाधव,प्रवीण होळकर, अर्जुन म्हेत्रे, अनंता खेत्रे, मोहन (मामा) गडदे, युवा नेते ऋषिकेश मोरे,धामणगाव सरपंच महारुद्र महारनवर, सरपंच महेश काळे, बाप्पू माने, बाळासाहेब गायकवाड, डॉ. अशोक बांगर, अनिकेत जाधव, अनिल श्रीरामे, संतोष राऊत, सुरज जाधव, डॉ. विठ्ठल राळेभात, महेश मासाळ, डॉ. नितीन अनभुले, अशोक बाफना, अरिफभाई सय्यद, सुनील हजारे, हनुमंत निकम, डॉ.अल्ताफ शेख, शुभम हुलगुंडे, अशोक शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.