Home ताज्या बातम्या नगर जामखेड रोडवरील अपुर्ण कामामुळे शिवसेना युवानेते आकाश बाफना अपघातात जखमी ...

नगर जामखेड रोडवरील अपुर्ण कामामुळे शिवसेना युवानेते आकाश बाफना अपघातात जखमी रस्त्यावर गतीरोधक, दिशादर्शक फलक, रेडियम बसवावेत – शिवसेना युवानेते आकाश बाफना

0
3

जामखेड न्युज—–

नगर जामखेड रोडवरील अपुर्ण कामामुळे शिवसेना युवानेते आकाश बाफना अपघातात जखमी

रस्त्यावर गतीरोधक, दिशादर्शक फलक, रेडियम बसवावेत – शिवसेना युवानेते आकाश बाफना

जामखेडचे युवा उद्योजक व शिवसेनेचे युवा नेते आकाश बाफना हे नगर रोडने जामखेड च्या दिशेने आपल्या चारचाकी इलेक्ट्रिक एम.जी. विंडसर गाडीने आपल्या भाच्याबरोबर येत असताना बाफना पेट्रोल पंपाकडे टर्न घेत असताना नगर रोडने येणाऱ्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पीओ गाडीने आमच्या गाडीला जोराची धडक दिली व स्कॉर्पीओ गाडी भरघाव वेगाने निघून गेली यात आकाश बाफना हे किरकोळ जखमी झाले.

नगर जामखेड सिमेंट रस्ता झालेला आहे. रस्त्यावर गतीरोधक, दिशादर्शक फलक, रेडियम नसल्याने वाहनांचा वेग जास्त असतो यामुळे अपघात होतात ठेकेदारांने ताबडतोब या रस्त्यावर गतीरोधक टाकावेत, दिशादर्शक फलक लावावेत तसेच जागोजागी रेडियम बसवावेत अशी मागणी शिवसेना युवानेते व उद्योगपती आकाश बाफना यांनी जामखेड न्युजशी बोलताना केली आहे.

आकाश बाफना यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनाक ३ एप्रिल रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारस मी माझे बरोबर माझा भाचा नामे मित आमित चोपड़ा वय 16 वर्षे असे घरुन माझी एम.जी. विंडसर कंपनीची कार नंबर MH-16-DS-0823 ही मधुन नगर ते जामखेड रोड ने जामखेड कडे येत असताना मी बाफना पेट्रोल पंपाकडे टर्न घेत असताना नगर ते जामखेड रोडने एक स्कॉर्पीओ काळ्या रंगाची जीप ही भरधाव वेगात आली व मी टर्न घेत असताना सदर स्कॉर्पीओ गाडीने माझे ड्रायव्हर साईडला जोरीची धडक देवुन निघुन गेला.

माझे गाडीला धडक बसल्याने दोन एअरबॅग (Airbag) खुलल्या व मला कंबरेला व उजवे हातास मार लागला आहे. सदर वेळी अपघात झाल्याने आजुबाजुचे लोकांनी मला व माझ्या भाचा मित गाडीचे बाहेर काढले सदर वेळी काही लोकांनी मला जोराची धडक देण्या-या वाहनाचा नंबर घेतला असुन त्या वाहनाचा नंबर MH-12-XX-8282 असा असल्याचे मला समजले आहे.

नगर ते जामखेड रोड ने मी पेट्रोल पंपाकडे टर्न घेत असताना नगर कडुन येणारी स्कॉर्पीओ काळ्या रंगाची जीप नंबर MH-12-XX-8282 ही वरील वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हायगयी ने अविचाराने रस्त्याचे परिस्थिती कडुन दुर्लक्ष करुन भरधाव वेगात चालवुन माझे गाडीस माझे ड्रायव्हर साईडला जोरीची धडक देवुन अपघाताची खबर न देता निघुन गेला आहे. माझे गाडीला धडक बसल्याने दोन एअरबॅग खुलल्या व मला कंबरेला व उजवे हातास मार लागला आहे. माझे भाच्यास किरकोळ मार लागला आहे. तसेच माझे कारचे नुकसान झाले आहे. म्हणुन स्कॉर्पीओ काळ्या रंगाची जीप नंबर MH-12-XX-8282 ही वरील वाहन चालका विरुद्ध र्फियाद दाखल करण्यात आली आहे.

वरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी कदम हे करत आहेत.

चौकट

नगर जामखेड रस्ता काही ठिकाणी अनेक दिवसांपासून अपुर्ण काम आहे. दिशादर्शक फलक, रेडियम कुठेही नाहीत, मधेच काही ठिकाणी डिव्हाइडर आहेत. या ठिकाणी गतीरोधक असणे आवश्यक आहे. गतीरोधक नसल्याने गाड्यांचा वेग खुपच असतो त्यामुळे या रस्त्यावर गतीरोधक, दिशादर्शक फलक रेडियम आवश्यक आहेत. लवकरच लवकर ठेकेदारांने अपघात टाळण्यासाठी ही कामे लवकर करावीत.
(शिवसेना युवा नेते आकाश बाफना)

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!