Home ताज्या बातम्या नागेश विद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त “मी मराठी “नाव साकारून केली जनजागृती...

नागेश विद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त “मी मराठी “नाव साकारून केली जनजागृती 1850 विद्यार्थ्यांचा सहभाग

0
3

जामखेड न्युज—–

नागेश विद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त “मी मराठी “नाव साकारून केली जनजागृती

1850 विद्यार्थ्यांचा सहभाग

रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय जामखेड मध्ये नागेश विद्यालय व कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न झाला.यावेळी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली.

एन एम एम एस परीक्षेमध्ये 80 विद्यार्थी पास झाले या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला
या परीक्षेत विद्यालयातील १३ विद्यार्थ्यांनी १२० पेक्षा अधिक गुण मिळवून घवघवीत यश मिळवले प्रथम क्रमांक आयुष अविनाश बोधले व संचित संतोष खैरे (दोन्ही १४९ गुण) द्वितीय क्रमांक: भोंडवे यश महादेव (१४७ गुण) तृतीय क्रमांक: वराट यशराज शहादेव (१४५ गुण) चौथा क्रमांक: भवर यशराज शंकर (१४४ गुण) तसेच जाधव ओम, वटाणे ओंकार, माळी कृष्णा, धुमाळ सोहम, पवार अथर्व, तिवारी करण, जगताप अनिश आणि रेळेकर श्रेयश या विद्यार्थ्यांनीही १२० पेक्षा अधिक गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवले आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशात मार्गदर्शक शिक्षकांचा मोठा वाटा आहे. बुद्धिमत्ता विभागाचे प्रमुख देशमुख एस.एस., विज्ञान विषयाचे मडके बी.के. व पठाण ए.एन., सामाजिक शास्त्राचे लटपटे डी.व्ही. आणि गणित विषयाचे चौधरे ए.बी. यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

यांचा विद्यालय वतीने सन्मान करण्यात आला तसेच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त
विद्यार्थी बैठक रचनेत “मी मराठी” नाव साकारून करून मराठी भाषेला मानवंदना दिली. कला शिक्षक तथा एनसीसी ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांनी हे नाव साकारले.
या मानवी रचनेच्या नावात 1850 विद्यार्थी शिक्षक झाले.

मराठी भाषा गौरव दिनाचा विजय असो, माझी भाषा मराठी , मी मराठी महाराष्ट्र माझा या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला.

यावेळी प्रमुख उपस्थिती प्राचार्य मडके बि के, मुख्याध्यापिका श्रीम भोर आर आर,मोहन यादव,प्रा मांडे ए एन,गुरुकुल प्रमुख संतोष ससाणे, संभाजी इंगळे, संभाजी देशमुख, श्रीम ज्योती गोपालघरे, शंभूदेव बडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्रीमती ज्योती गोपाळघरे निलेश अनारसे संभाजी इंगळे, मोहन यादव आदींनी मनोगत व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भाषणे केली. तसेच मराठी भाषा शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

मुख्याध्यापिका भोर आर आर यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य मडके बी के यांनी मनोगतामध्ये
कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांनी मराठी साहित्यात मोलाची कामगिरी केली.मराठी ही केवळ बोलीभाषा नसून ती एक समृद्ध ज्ञानभाषा आहे असे मार्गदर्शन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

या उपक्रमाचे आमदार रोहित दादा पवार, रा कॉ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, हरिभाऊ बेलेकर ,विनायक राऊत यांनी विशेष अभिनंदन केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!