नर्तिकेवर कोयत्याने हल्ला करणारा आरोपी जामखेड पोलीसांनी केला जेरबंद
बारा दिवसांपूर्वी जामखेड शहरात फोन का घेत नाहीत माझा नंबर का ब्लॉक केला आहे. असे म्हणून शिवीगाळ करून, दोन्ही हातावर कोयत्याने वार करत गंभीर जखमी करत फरार झाला होता जामखेड पोलीस त्यांच्या मागावर होते. अखेर जामखेड पोलीसांनी आरोपीस जेरबंद केले आहे.
दि.०६/०२ / २०२६ रोजी फिर्यादी नर्तिका हिने फिर्याद दिली की,आरोपी नामे राहुल अशोक कचरे रा. खळेगाव ता. गेवराई जि.बीड हल्ली रा. मिलींदनगर, जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर याने तु मला फोनवर का बोलत नाहीस, माझा नंबर का ब्लॉक केला आहे.
असे म्हणून शिवीगाळ करून, दोन्ही हातावर कोयत्याने मारून जखमी करून, जिवे मारण्याच्या उददेशाने डोक्यात मारून जखमी केले व तु जर मला बोलली नाही तर संपवून टाकीन अशी धमकी दिली आहे.
वरिल फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नं. ६५ / २०२६ बी एन एस कलम १०९, ३५२,३५१(२),शस्त्र अधिनियम कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर सदर आरोपीचा शोध घेत असताना दि. १४/०२/२०१५ रोजी पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली होती.
इसम नामे राहुल अशोक कचरे रा. खळेगाव ता. गेवराई जि.बीड हल्ली रा.मिलींदनगर, जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर हा भुम बसस्थानक ता. भुम जि. धाराशिव येथे येणार आहे. अशी बातमी मिळाल्याने पोनि दशरथ चौधरी यांनी सदरची माहीती गुन्हे शोध पथकाचे पोकॉ/२४२७ देविदास पळसे, पोकॉ/ ७५४ कुलदिप घोळवे, पोकॉ / १०१३ आकाश शेवाळे अशांना देवून लागलीच सदरचे पथक खाजगी वाहनाने इसम नामे राहुल अशोक कचरे रा. खळेगाव ता. गेवराईजि.बीड हल्ली रा. मिलींदनगर, जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर याचे शोध घेणे कामी भुम बसस्थानक ता. भुम जि: धाराशिव येथे रवाना केले
सदरचे पथकाने भुम पोलीसांचे मदतीने भुम बसस्थानक परिसररात शोध घेत असताना अशोक कचरे रा. खळेगाव ता. गेवराई जि. बीड हल्ली रा. मिलींदनगर, जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर हा २१/०० वाजणेचे सुमारास पथकास भूम बसस्थानक परिसरात एका झाडाखाली त्याचे अस्तित्व लपवून उभा असल्याचे दिसुन आले. पथकाने त्यास ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उप विभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे कर्जत विभाग यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, सपोनि वर्षा जाधव,पोकॉ देविदास पळसे, पोकॉ/ कुलदिप घोळवे, पोकॉ / आकाश शेवाळे, भुम पोलीस स्टेशनेच पोना संदेश क्षिरसागर तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोकॉ नितीन शिंदे, राहुल गुंडू यांनी केली आहे.