जामखेड प्रतिनिधी
स्री हाच कुटुंबाचा आधार असल्याने त्यांनी आपली स्वच्छता व आरोग्य जपले पाहिजे. तसेच कुटुंबांच्या स्वच्छते बरोबरच सार्वजनिक स्वच्छता मोहीमेतही सहभाग नोंदवावा असे प्रतिपादन डॉ. माया पोकळे यांनी केले.
जामखेड येथील प्रभाग क्रमांक २० मधील आरोळे वस्ती येथे दि. ४ जानेवारी रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महिला मुक्ती दिना निमित्त स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. माया पोकळे व डॉ. शोभा ताई आरोळे यांच्या उपस्थितीत युवा उद्योजक रमेश ( दादा) आजबे यांच्या वतीने एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी डॉ. माया पोकळे, डॉ. शोभा ताई आरोळे, रमेश(दादा) आजबे, सौ. अश्विनी रमेश आजबेंसह महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. माया पोकळे, डॉ. शोभाताई आरोळे
यांनी महिलांच्या स्वछतेबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले. महिलांनीही त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या शंका डॉक्टरांना विचारल्या. त्यांच्या शंकाचे डॉक्टरांनी निवारण केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांना
विशेष भेटवस्तू म्हणून हायजिन किटचे वितरण करण्यात आले. यावेळी अल्पोपाहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती.
कर्जत-जामखेडचे युवा आ. रोहित (दादा) पवार व त्यांच्या मातोश्री सौ. सुनंदाताई पवार यांच्या मार्गदर्शनानुसार सावळेश्वर उद्योग समुहाचे संचालक रमेश (दादा) आजबे आणि सौ. अश्विनीताई आजबे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी रमेश (दादा) आजबे यांनी आभार मानले.
सावळेश्वर उद्योग समूहाचे रमेश आजबे यांनी समाजसेवेचा वसा उचलला आहे. कोट्यावधी रुपयांची पदरमोड करून रस्ते वीज व पाणी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अनेक वर्षे बंद असलेला ल. ना होशिंग विद्यालय व जामखेड महाविद्यालयात बीड रोडवरून जाण्याचा रस्ता मोकळा करून पेव्हिंग ब्लाॅक बसवून दिले
यामुळे सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांची सोय झाली आहे.
तसेच अनेक ठिकाणी शहरात वृक्षारोपण करून त्या झाडांना संरक्षक जाळी बसवली व उन्हाळ्यात टॅंकरने पाणी घातले त्यामुळे आज झाडे डेरेदार झाले आहेत. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिलांसाठी मेळावे घेऊन महिलांच्या अडीअडचणी विषयी माहिती जाणून घेतली व आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.