जामखेड न्युज—–
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी उद्या जामखेडमध्ये सर्वपक्षीय शोकसभा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याच्या राजकारणात ठाम, तडकाफडकी निर्णयक्षम नेतृत्व म्हणून ओळख असलेले अजित दादा पवार यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. 30 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता जामखेड शहरातील तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

अजित पवार यांनी अनेक वर्षे राज्याच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली असून प्रशासनावर भक्कम पकड, स्पष्ट भूमिका आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने राज्यातील राजकारणासह समाजकारणातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी पहाटे विमान अपघातात दुःखद निधन झालं राज्याच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व काळाच्या पडद्या आड गेले.




