स्व. देवराव दिगांबर वराट काॅलेज आँफ फार्मसी साकत ता.जामखेड जि.अहिल्यानगर येथे बी फार्मसी परीक्षेस सुरूवात
परीक्षार्थींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत
साकत येथील संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था साकतचे स्व. देवराव दिगांबर वराट काॅलेज आँफ फार्मसी साकत हे डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल विद्यापीठ लोणेरे जि. रायगड शी संलग्नित असून शैक्षणिक वर्ष 25– 26 बी. फार्मसी च्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेस सुरूवात झाली आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल विद्यापीठ लोणेरे जि. रायगड यांनी साकत येथील संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था साकतच्या स्व. देवराव दिगांबर वराट काॅलेज आँफ फार्मसी साकत येथे बी.फार्मसी अभ्यासक्रमाचे परीक्षा केंद्रास मंजूरी दिली आहे. बी फार्मसी परीक्षेस आज मोठ्या उत्साहात सुरूवात झाली.
ग्रामीण भागात साकत येथे परीक्षा केंद्र असल्यामुळे परीक्षार्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या फार्मसी कॉलेज चा डी फार्मसी प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाचा निकाल 100 टक्के लागला होता.
यावेळी परीक्षार्थीं विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा अरुण वराट, संस्थेचे सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड चे माजी उपसभापती तथा संचालक कैलास वराट(सर )बाह्य परीक्षा नियंत्रक प्रा. तांदळे प्रशांत , मुख्य परीक्षा नियंत्रक डॉ. गोरक्ष बारगजे, उप प्राचार्य शुभम जाधव, प्रा. सय्यद सना मॅडम, प्रा.बडे कांचन मॅडम, प्रा. रमेश डिसले, प्रा. गीते स्वामी, प्रा. माने कैलास, कार्यालयीन अधीक्षक श्रीकृष्ण पुलवळे, अशोक नेमाने सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
चौकट संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था साकत संचलित स्व. देवराव दिगांबर वराट काॅलेज आँफ फार्मसी साकत येथे डी फार्मसी व बी फार्मसी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत दोन्ही अभ्यासक्रमाच्या परीक्षा केंद्रास उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे जिल्हा रायगड यांची मान्यता मिळालेली असून भविष्यात अनेक अभ्यासक्रम सुरू करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा.अरुण वराट यांनी दिली.