संविधान महोत्सव समितीच्या वतीने पत्रकारिता, शिक्षण, वैद्यकीय, क्रीडा व वृक्षमित्र पुरस्कार प्रदान सुदाम वराट, श्रीकांत होशिंग, डॉ सुशिल पन्हाळकर, संतोष टेकाळे व उत्तम पवार यांचा सन्मान
संविधान महोत्सव समितीच्या वतीने पत्रकारिता, शिक्षण, वैद्यकीय, क्रीडा व वृक्षमित्र पुरस्कार प्रदान
सुदाम वराट, श्रीकांत होशिंग, डॉ सुशिल पन्हाळकर, संतोष टेकाळे व उत्तम पवार यांचा सन्मान
जामखेड शहरात प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने २६ जानेवारी २०२६ रोजी“ तेराव्या संविधान महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी भव्य मोटारसायकल रँली व यानंतर विविध क्षेत्रातील पाच मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
शिक्षण क्षेत्र
श्रीकांत बाळकृष्ण होशिंग उत्कृष्ट प्राचार्य म्हणून ल ना होशिंग माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड येथे काम करून सेवानिवृत्त झाले सुमारे ३५ वर्षे शिक्षण क्षेत्रात कामकेले, सकाळ वर्तमानपत्रात सलग दोन वर्षे दहावी साठी लेखन सदर लेखन केले. दहावी साठी तयारी तयारी दहावीची या पुस्तकाची निर्मिती केली,विद्यालयात विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवले विद्यालयात वनौषधींची बाग फुलवली, सर जगदीशचंद्र बोस बोटोनिकल गार्डन तयार केले. मुख्यमंत्री सुंदर शाळा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून देण्यात मोठा सहभाग होता. तसेचदहावी बारावी उत्कृष्ट निकालासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले याच कार्याचा गौरव संविधान महोत्सव समिती च्या वतीने करण्यात आला आहे.
पत्रकारिता क्षेत्र – सुदाम वराट
सुदाम वराट हे गेल्या सतरा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. सुरूवातीलापाच वर्षे सकाळ वर्तमानपत्रात काम केले सध्याबारा वर्षापासून सामना वर्तमानपत्रात जामखेड तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत तसेच चार वर्षापासून जामखेड न्यूजचे संपादक म्हणून काम करत आहेत. पत्रकारितेत काम करताना अनेक सामाजिक, शैक्षणिक प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून सोडवत वंचित घटकांना न्याय मिळवून दिला. शालेय पोषण आहार योजना निकृष्ट व कालबाह्य धान्यादी मालाबाबबत बातमी प्रसिद्ध करत राज्यातील सर्व शाळांमध्ये उच्च प्रतिचा माल मिळू लागला तसेच पिंपळवाडी, कडभनवाडी शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटी बस सुरू करण्यात मोलाचा वाटा तसेच रस्ते, पुल, वीज प्रश्न मार्गी लावले. निकृष्ट रस्ता तसेच जलजीवन काम करणाऱ्या विरोधात बातम्या प्रसिद्ध करत काही ठेकेदारांवर कारवाई झाली तसेच काहींना काळ्या यादीत टाकण्यात आले. वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सुदाम वराट यांनी आपल्या पत्रकारितेचा वापर केला यांची दखल घेत संविधान महोत्सव समिती च्या वतीने उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला आहे.
वैद्यकीय क्षेत्र – डॉ सुशिल पन्हाळकर
वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दलडॉ सुशिल पन्हाळकर यांना पुरस्कार देण्यात आला आहे. डॉ पन्हाळकर यांनी आतापर्यंत अनेक गोरगरीब रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे.
सामाजिक व क्रीडा क्षेत्र – संतोष टेकाळे सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल संतोष टेकाळे यांना पुरस्कार देण्यात आला आहे. मल्लखांब स्पर्धेत आतापर्यंत त्यांचे अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर खेळलेले आहेत. तसेच खेलो इंडिया मध्ये ही त्यांचे खेळाडू चमकले आहेत. शिवशंभू मर्दानी खेळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गुणी खेळाडू घडवले आहेत.
वृक्षमित्र म्हणून उत्तम पवार यांना पुरस्कार देण्यातआला आहे. पवार यांनी पाटोदा शाळेत छान वृक्षारोपण करत शालेय परिसर हरित केला आहे.त्यांच्या कार्याची दखल घेत पुरस्कार देण्यात आला आहे.
अशा प्रकारे विविध क्षेत्रातील पाच मान्यवरांचा संविधान महोत्सव समिती च्या वतीनेसंविधान प्रत तसेच स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.
यावेळी झी युवा संगीत सम्राट फेम, काळजावर कोरले नांव भीमा कोरेगाव फेम तसेच तुफानातले दिवे आम्ही फेम अजय देहाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर, प्रबोधनात्मक विविध शिव भिम गीतांच्या माध्यमातून प्रबोधन करून जुने व नविन गिते सादर केली,या वेळी उपस्थित जनसमुदाय यांनी टाळ्यांच्या कडकडाटांनी साथ दिली.
विकी भाऊ सदाफुले व समस्त भिमसैनिकांनी अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमानंतर सर्वांची जेवणाची सोय करण्यात आली होती.