नगरसेविका नंदाताई प्रविण होळकर यांचा तिळगुळ व हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
साधी राहणी उच्च विचारसरणी तसेच शांत,संयमी स्वभाव आणि सर्व सामान्य कुटुंबातील महिला नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे अशा नंदाताई प्रविण होळकर यांच्या वतीने शनिवार दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी होळकर निवासस्थान, स्वराज नगर, तपनेश्वर गल्ली,जामखेड या ठिकाणी तिळगुळ व हळदी कुंकू समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मकरसंक्रांत निमित्त महिलांकरिता आयोजित करण्यात आलेल्या सर्वांगसुंदर कार्यक्रमाला लाडक्या बहिणींची अलोट गर्दी पहावयास मिळाली.तसेच विविध मान्यवर व्यक्तींनी सदर कार्यक्रमास भेटी देऊन शुभेच्छा दिल्या.यामध्ये जामखेड नगरपरिषदेच्या लोकनियुक्त प्रथम महिला नगराध्यक्षा प्रांजलताई अमितशेठ चिंतामणी,खर्डा ग्रामपंचायत सरपंच संजीवनीताई पाटील, नगरसेविका सीमा रविंद्र कुलकर्णी, जया संतोष गव्हाळे, आशाबाई बापू टकले, वैशाली अर्जुन म्हेत्रे, सुमन अशोक शेळके, जातेगाव ग्रामपंचायत माजी सरपंच दिपाली गर्जे तसेच शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणी संजय काशिद, सविता प्रविण सानप, राजश्री मोहन पवार, वर्षा श्रीराम डोके, रुपाली गणेश डोंगरे,लक्ष्मी पवार व नंदा राजेंद्र गोरे यासह शैक्षणिक,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील महिला भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.सदर कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या मान्यवर व्यक्तीचा यथोचित सन्मान प्रभाग सातच्या नगरसेविका नंदा प्रविण होळकर यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी व सरपंच संजीवनी पाटील यांनी आपल्या मनोगतातून सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल नंदाताई प्रविण होळकर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व महिला भगिनी, विविध मान्यवर व्यक्ती यांचे आभार नगरसेविका नंदाताई प्रविण होळकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.तसेच मकरसंक्रांती निमित्त सर्व महिला भगिनी यांना शुभेच्छा दिल्या.
विठ्ठल रुक्मिणी सुंदर मूर्ती ,सेल्फी पॉईंट,सुंदर डेकोरेशन, आकर्षक रोषणाई, मान्यवर व्यक्ती सत्कार समारंभ, महिलांचा उदंड प्रतिसाद, स्वादिष्ट व रुचकर नाष्टा या सर्व बाबी सदर कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षणबिंदू ठरल्या. संक्रांत वाण म्हणून उपस्थित सर्व महिला भगिनी यांना इन्सुलेटेड ऍडजस्टेबल टिफिन बॉक्सचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजपा शहर मंडल उपाध्यक्ष प्रविण होळकर,प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व प्रभाग सात मधील सर्व लाडक्या बहिणी यांनी विशेष परिश्रम घेतले.