जामखेडचा सायकलस्वार प्रजासत्ताकदिनी वाघा बाँर्डरवर फडकवणार तिरंगा जामखेड – अजमेर – अमृतसर- वाघा बाँर्डर सायकल यात्रेत रोजच्या जीवनात व्यायामाचे महत्त्व व पर्यावरण जागृती हा संदेश

0
385

जामखेड न्युज——

जामखेडचा सायकलस्वार प्रजासत्ताकदिनी वाघा बाँर्डरवर फडकवणार तिरंगा

जामखेड – अजमेर – अमृतसर- वाघा बाँर्डर सायकल यात्रेत रोजच्या जीवनात व्यायामाचे महत्त्व व पर्यावरण जागृती हा संदेश

 

सर्व धर्म समभाव हा संदेश देत, व्यायामाचे महत्त्व, इंधन बचाव प्रदुषण घटाव व पर्यावरण संवर्धन तसेच आरोग्यदायी शरिराला व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जामखेड ते अजमेर अमृतसर स्वर्णमंदिर वाघा बाँर्डर असा २ हजार किलोमीटर सायकल प्रवास जामखेड येथील तरूण सायकलस्वार डॉ समीर शेख करणार आहेत.

अशा सायकल प्रवासाचे हे पाचवे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे दि १३ जानेवारी २०२६ रोजी समीर शेख सायकलवर रवाना होत आहेत. सायकलिंग क्लबचे सदस्य असलेले समीर शेख हे वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत आहेत.

रोज २०० किमी सायकल प्रवास करत जामखेड ते वाघा बॉर्डर हा प्रवास २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी भारत पाकिस्तान सीमा वाघा बाँर्डर येथे तिरंगा फडकविण्याचा मानस व निर्धार त्यांनी केला आहे.

सायकल प्रवास करत चांगले वाईट अनुभव घेत मजेशीर जिवन जगत तसेच, कसलेही कामाचे तान, तणाव न घेता जगण्याचा गोड अनुभव घेत, आयुष्यात माणसाने स्वतः साठी जगून घ्यावे शेवटी हा अनुभव खूप सुख देतो.

मानवतावाद, सर्व धर्म समभाव, पर्यावरण जनजागृती, तसेच रोजच्या जीवनात व्यायामाचे महत्त्व व पर्यावरण जागृती हा संदेश या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश आहे असे समीर शेख यांनी सांगितले.

या प्रवासात जुबेर काझी हे बरोबर असणार आहेत. सायकल प्रवासाचा मार्ग महाराष्ट्र ,मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब ह्या राज्यांतून असेल तसेच अमृतसर पंजाब येथील सर्व धार्मिक लोकांना खुले असलेले सुवर्ण मंदिर येथे नतमस्तक होऊन पुढे वाघा बॉर्डर पर्यंत जाण्याचे प्रयत्न करणार आहे तरी मला ह्या प्रवासात काही अडचण आली तर मदत करण्याचे आवाहन समीर शेख यांनी केले आहे. 8087780841

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here